सध्या गव्हाच्या दरात प्रति क्विंटल 600 ते 900 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे आता हंगामात गव्हाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे ही वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. देशात यंदा गव्हाचे उत्पादनही घटलं आहे.
त्याचा परिणाम किंमंतीवर होत आहे. यामुळे महाराष्ट्रातही गव्हाच्या किंमतीत वाढ होत आहे. यामुळे आता तुमच्या ताटातील पोळी महागणार आहे. नर्मदा सागर, चंदोशी, आणि सरिता सागर या गव्हाच्या किमतीत ही वाढ झाली आहे. 3500 वर हे दर आता गेले आहेत.
आता यावर्षी हवामानावर आणि उत्पादनावर हे दर अवलंबून राहणार आहेत.पुण्यात (Pune) गव्हाच्या दरांमध्ये दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे. तर नागपूरमध्ये पाच रुपयांपर्यंत वाढले आहेत.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' तणनाशकावर बंदी, सरकारने घेतला निर्णय..
केंद्र सरकारने हमीभावात वाढ करणं, भारतात सध्या तुलनेने कमी गहू साठा असणं, युक्रेन-रशिया युद्ध या सर्व घटनांचा परिणाम म्हणून गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता सरकार याच्या उत्पादनावर लक्ष ठेवून आहे.
'नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकांची मागणी करणार'
दरम्यान, देशात यंदा गहू उत्पादन घटले आहे. तसेच निर्यातही जास्त झाली. त्यामुळं गव्हाचे दर तेजीत असल्याचं चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढेल, या आशेने गव्हाचा साठा मागे ठेवला होता.
महत्वाच्या बातम्या:
फलोत्पादन शेत्रातल्या योगदानाबद्दल शेतकऱ्यांचा कृषी मंत्र्यांच्या हस्ते सत्कार
चालू आर्थिक वर्षात भारतीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीत 25 टक्क्यांनी वाढ
पीक विमा कंपन्यांनी तालुका स्तरावर उघडली कार्यालये, आता शेतकऱ्यांना होणार फायदा
Share your comments