Kharif Season: देशात सध्या मान्सूनचा पाऊस (Monsoon Rain) जोरदार बरसताना दिसत आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मात्र सध्या पाऊस ओसरला असला तरी खरीप पिकांवर रोगाचे सावट (Disease severity) घोंगावत आहे. सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात रोग पडत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
पावसाने राज्यात सुरुवातीला काही भागात दडी मारली होती. त्यामुळे त्या भागातील खरीप पिकांच्या (Kharif crops) पेरणीला उशीर झाला होता. मुसळधार पावसामुळे या पिकावर रोग पडत आहेत. सोयाबीन पिकावर (Soybean crops) केवडा रोगाने (Kevada disease) शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच यलो मोझॅक रोगाची भर पडत आहे.
यलो मोझॅक रोगाने तर सोयाबीनची अख्खे शेत उध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका काही कमी होताना दिसत नाही. ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक हाताला लागणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
गहू उत्पादकांचे येणार सुगीचे दिवस! हेक्टरी 82 क्विंटल उत्पादन देणारे गव्हाचे 3 वाण विकसित
सध्या पाऊस उघडला असल्याने कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सोयाबीनचे पीक सध्या फुलोऱ्यात आहे. या दिवसांत जर पोषक वातावरण राहिले तर सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होऊ शकते.
मात्र काही ठिकाणी केवड्याच्या रोगाने सोयाबीन पिके उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. दमट आणि ढगाळ वातावरण या रोगाला पोषक ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोगराई आणि पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
Gold Price: आजच खरेदी करा सोने आणि चांदी! 10 ग्रॅम सोने खरेदीमागे वाचतील 4795 रुपये
उपाय
सोयाबीन पिकावर केवडा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लागवडीसाठी उपलब्ध असलेले प्रमाणित प्रतिकारक बियाणे गरजेचे आहे. लागवड करत असताना दाट करू नये तसेच खतांचे नियोजन करत असताना खतांचा डोस जास्त होऊ नये याची काळजी घ्यावी.
किमान एक वर्षासाठी तरी सोयाबीनचा इतर पिकांची फेरपालट केल्यास केवडा रोगाची घटना कमी होऊ शकतात. पुढील वर्षात हे रोग होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी संक्रमित पिकाचे अवशेष गाडून टाकावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Onion Price: कोणी पैसे देतं का पैसे! कांद्याच्या घसरलेल्या किमतीमुळे शेतकरी मेटाकुटीला...
Maharashtra Weather: राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट; पहा या आठवड्यातील हवामान
Share your comments