डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्युबेशन फॉउंडेशन अंतर्गत दोन दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. २३ ते २४ फेब्रुवारी, २०२२ दरम्यान करण्यात आले आहे. सदर राष्ट्रीय परिषदेचा विषय "कृषी उद्योजकता: कृषी क्षेत्रातील स्टार्ट-अप इकोसिस्टमला चालना देण्याचा मार्ग" हा आहे.
या राष्ट्रीय परिषदेचे उदघाट्न कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. भीमराया मेत्री, संचालक, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर यांचे हस्ते दिनांक २३ फेब्रुवारी, २०२२ रोजी झाले ते ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एम. भाले, मा. कुलगुरू डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला हे होते.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक (संशोधन) तथा संचालक, पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्युबेशन फॉउंडेशन, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला, डॉ. आर. एम. गाडे, संचालक (विस्तार शिक्षण), डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला, डॉ. पी. के. नागरे, अधिष्ठाता, उद्यानविद्या, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला व डॉ. एस. बी. वडतकर, अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी विद्याशाखा, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला हे या उदघाट्न कार्यक्रमप्रसंगी सेमिनार हॉल, कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोला येथे उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमप्रसंगी डॉ. एस. एस. हरणे, नोडल ऑफिसर, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प,डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला यांची उपस्थिती होती. डॉ. एस. आर. काळबांडे, कुलसचिव तथा प्रमुख अन्वेषक व संचालक, पिडीकेव्ही रिसर्च वइन्क्युबेशन फॉउंडेशन,
डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी आपल्या भाषणात पि.डी. के. व्ही. रिसर्च व इन्क्युबेशन फॉउंडेशनचा मुख्य उद्देश अग्री स्टार्ट अप चा विस्तार करण्यासाठी आवश्यक सुविधा
पुरवणे जसे इंटरनेट लॅब सुविधा पुरवणे, फॅब्रिकेशन वर्कशॉप उपलब्ध करणे, मेंटॉरशिप सुविधा देणे ई.
थोडक्यात असा उद्देश असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोयायटी, महाराष्ट्र
राज्य सरकार द्वारे या इनक्युबेशन फॉउंडेशनला मंजुरी देण्यात आली असून याच सोसायटी द्वारे
इनक्युबेशन फॉउंडेशनला निधी मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोयायटी, अंतर्गत राज्यात १७ इन्क्युबेशन कार्यरत आहेत त्यापैकी राज्यातील कृषि विद्यापीठास मिळालेले हे एकमेव इन्क्युबेशन असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या राष्ट्रीय ई-परिषदेसाठी १८१
संशोधन निबंध प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली तसेच या ई -परिषदेसाठी जवळपास १०० प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे विशेष अतिथी डॉ. एस. बी. वडतकर, अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी विद्याशाखा, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला, यांनी आपल्या भाषणात कृषि क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनाचे स्टार्ट-अप मध्ये रूपांतर करण्यासाठी अश्या प्रकारच्या इन्क्युबेशनची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी अग्री स्टार्ट अप ला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. भीमराया मेत्री, संचालक, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे मनुष्यबळाचे पलायन रोखण्यासाठी कृषी- उद्योगांना चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात कृषी उद्योगास चालना मिळाल्यास रोजगार वाढ होण्यास मदत होईल असे त्यांनी यावेळी नमूद केले. स्मार्ट व्हिलेज हि संकल्पना आपल्या देशासाठी अतिशय महत्वाची असून ती पूर्णत्वास आणण्यासाठी कृषी उद्योगास चालना मिळणे, ग्रामीण भागात अग्री स्टार्ट अप निर्मितीस चालना मिळणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एम. भाले, मा. कुलगुरू डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी आपल्या भाषणात कोरोना काळात इतर क्षेत्र जवळपास बंद असतांना कृषि क्षेत्र चालूच असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठात उपलब्ध असलेले तंत्रज्ञान, मूलभूत सुविधा तसेच तांत्रिक मदत याचा लाभ •पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्युबेशन फॉउंडेशनला होऊन याद्वारे कृषि स्टार्ट अप ला चांगला प्लॅटफॉर्म मिळेल तसेच उद्योग स्थापनेस चालना मिळेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. रोजगार निर्मितीसाठी इन्क्युबेशन केंद्रांची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात छोटे कॉटन जिंनिंग उद्योग स्थापनेस वाव देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती नारनवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राजेश मुरूमकार यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री. महेंद्र राजपूत, श्री. सागर पाटील, डॉ अमरदीप डेरे, रसिका बुरघाटे तसेच सर्व कर्मचारी पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्यूबेशन फॉउंडेशन व राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, डॉ पंदेकृवि, अकोला यांनी विशेष परिश्रम घेतले.
Share your comments