मागच्या वर्षी आपण अतिरिक्त उसाचा प्रश्न किती भयानक पद्धतीने उभा राहिला होता हे पाहिले आहे. कारखान्यांचे गाळप हंगाम संपल्याच्या तारखे नंतर देखील बरेच दिवस कारखाने या अतिरिक्त उसाच्या गाळप करण्यासाठी सुरू ठेवावे लागले. या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न पुन्हा उद्भवू नये तसेच शेतकऱ्यांचा शेतातला ऊस कारखाने जोपर्यंत सुरू असतील तोपर्यंत कारखान्यापर्यंत जावा यासाठी या वर्षीच्या गळीत हंगाम 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नक्की वाचा:कारखाने कसे विकत घेतले? आयकरची धाड पडलेल्या अभिजित पाटलांनी केला मोठा खुलासा
मागच्या वर्षी सारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी तोडगा काढण्यासाठी या वर्षी ऊस गाळप हंगाम 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.सोमवारी सावे यांनी साखर आयुक्तालयाचे आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
नक्की वाचा:आताची मोठी बातमी! पुण्यात दारू बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश..
यावर्षी असलेली उसाची परिस्थिती
मागच्या वर्षी ज्या प्रमाणात ऊस गाळपाला आला होता तेवढाच ऊस यावर्षी देखील येईल अशी एक शक्यता असल्यामुळे मागच्या वर्षीची समस्या या वर्षी उद्भवू नये या कारणाने यावर्षीचा साखर हंगाम दर वर्षाच्या तारखेपेक्षा पंधरा दिवस आधीच सुरू करण्याबाबत 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिगटाची बैठक घेण्यात येणार आहे व
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबतची लागणारी सगळी तयारी देखील साखर आयुक्तालयाने पूर्ण केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
Share your comments