आतापर्यंत हवामान विभागाने सर्व अचूक अंदाज लावले आहेत जे की त्याप्रमाणे अगदी हवामानात बदल घडताना दिसत आहेत. मागील २४ तासांमध्ये उत्तर-पश्चिम तसेच मध्य आणि पूर्व भारतातील बऱ्याच भागांमध्ये पाऊसाची नोंद करण्यात आलेली आहे. भारतीय हवामान शास्त्रीय विभागाने यासंबंधी बुधवारी माहिती दिली आहे. एवढेच नाही तर उत्तर प्रदेश मधील काही भागात आज कडाक्याची थंडी पडणार असल्याचे सुद्धा हवामान विभागाने सांगितले आहे. याव्यतिरिक्त उत्तर-पश्चिम भारत, पूर्व आणि ईशान्य भारतात सुद्धा पाऊस पडण्याची दाट शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
महाराष्ट्र राज्यात वाढणार थंडी :-
भारतीय हवामानशास्त्रीय विभागाने कालच्या बुधवारी केलेल्या प्रकाशनानुसार ५ फेब्रुवारी पर्यंत पश्चिम हिमालयीन प्रदेशातील काही भागांमध्ये हलका व मध्यम पाऊस तथा बर्फवृष्टी सुदधा होईल अशी दाट शक्यता वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधील काही भागात आज आणि उद्या गारपीठ होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हिमाचल प्रदेशात अचानकपणे आज किंवा उद्या मुसळधार पाऊस तसेच बर्फवृष्टी होऊ शकते असा अंदाज सुद्धा वर्तविला आहे. अशीच परिस्थिती उत्तराखंड मध्ये सुद्धा आज किंवा उद्या होऊ शकते असेही सांगितले आहे. या हवामान बदलामुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
पंजाबसह या भागात होणार पाऊस :-
पंजाबसह हरियाणा, चंदिगढ, दिल्ली आणि उत्तरप्रदेश मधील काही भागांमध्ये ३ फेब्रुवारी आणि ४ फेब्रुवारी ला हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याव्यतिरिक्त बिहार आणि झारखंड या राज्याचे सुद्धा हलका तथा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
थंडीमुळे नागरिकांना हुडहूडी :-
पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे. बुधवारी दिलेल्या माहितीनुसार काश्मीर मधील तापमान शून्य अंशाच्या खाली गेले होते तसेच येईल या तीन दिवसांमध्ये हवामान खात्याने हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा बर्फवृष्टी पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. श्रीनगर मध्ये सुद्धा १.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे जे की आधीच्या रात्री श्रीनगर मध्ये १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती असे हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Share your comments