दीड वर्षात पीएम किसान योजनेच्या अतंर्गत १७ हजार निधी बँकेत जमा

Monday, 10 August 2020 07:42 AM


मागील दीड वर्षात ७५ हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाला आहे. त्यातले २२ हजार कोटी रुपये हे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.  साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपाने १७ हजार कोटी रुपये जमा करताना मला आनंद होतो आहे,  असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या पायाभूत सेवा सुविधांसाठीच्या आर्थिक तरतुदींची घोषणा केली.  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी पीएम-किसान योजने अंतर्गत विविध घोषणा केल्या. शेतकरी समित्या, FPOs यांना गोदामं तयार करण्यासाठी, कोल्ड स्टोअरेज उभारण्यासाठी, फूड प्रोसेसिंग उद्योगांसाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याआधी e-NAM द्वारे एक उत्कृष्ट व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

आता कायदा तयार करून शेतकऱ्याला बाजाराच्या वर्तुळातून आणि बाजाराला कराच्या वर्तुळातून मुक्त केले जाईल. या निर्णयामुळे शेतकरी त्याच्या शेतात येणाऱ्या उत्पादनांचा थेट सौदा करु शकतो. एवढंच नाही तर सरळ गोदामे, e-NAM शी जोडल्या गेलेल्या संस्था, व्यापारी जे त्याला जास्त किंमत देतील त्यांच्याशी पिकाचा सौदा करु शकतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.  पीएम किसान योजना ही छोट्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बनविण्यात आली आहे.

PM Kisan Yojana PM Kisan Samman Nidhi Yojana PM-KISAN पंतप्रधान किसान सन्मान निधी pradhanmantri kisan samman nidhi prime minister narendra modi पंतप्रधान नरेंद्र मोदी
English Summary: In the last one and a half years, 17,000 funds have been deposited in the bank under PM Kisan Yojana

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.