राजस्थान मध्ये शेतकऱ्यांनी लावलेल्या कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे अक्षर शेतकऱ्यांनी दोनशे पन्नास कोटी किमतीच्या कांद्यावर ट्रॅक्टर चालवला असून त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
तसेच कांदा तालिबान कडून आयात न झाल्यास कांद्याला फायदा होईल. तालिबानी अफगाणिस्तान वर कब्जा केल्यामुळे या वेळेस कांदा बाजारात तेजी येण्याची शक्यता होती तसेच शेतकऱ्यांनी हजारो एकरामध्ये कांद्याची पेरणी केली. परंतु या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे राजस्थान मधील एकट्या अलवर जिल्ह्यात सुमारे 250 कोटीच्या कांदा पिकामध्ये जलेबी रोग आला.म्हणून तेथील शेतकऱ्यांनी उभ्या कांद्याच्या पिकावर ट्रॅक्टर चालवून कांदा नष्ट केला.
हेही वाचा:या योजनेअंतर्गत बळीराजाला मिळणार 40,000 रुपये जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ
राजस्थान मधील प्रमुख असलेल्या अलवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी साधारणतः 250 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. एकट्या अलवर जिल्ह्यामध्ये 40 हजार एकर क्षेत्रात कांद्याची पेरणी झालेली होती. जर कांदे पीक चांगले आले असते व भाव चांगला मिळाला असता तर जवळजवळ सहाशे कोटी रुपयांपर्यंतचेउत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकले असते. तसेच राज्यात आणि देशभरात हजारो कोटी रुपयांचा फायदा होऊ शकला असता.
परंतु पावसामुळे सगळे पीक नष्ट झाल्याने येथील शेतकरी कमालीचा हवालदिल झाले आहेत.
कांदा पिकामध्ये शेतकऱ्यांना एका एकर मध्ये सुमारे तीस हजारापर्यंत नुकसान सहन करावे लागते. आता ज्या शेतकऱ्यांनी कांदा वाचून तो टिकवून ठेवला आहे त्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे परंतु व्यापारी असे गृहीत धरत आहेत की यावेळी किमती सामान्य राहतील.
Share your comments