1. बातम्या

या योजनेअंतर्गत बळीराजाला मिळणार 40,000 रुपये जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ

जर तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हरियाणा सरकारने 'मुख्यमंत्री फलोत्पादन विमा योजने'अंतर्गत फळबाग पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एम एल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी हरियाणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री फलोत्पादन विमा योजना (MBBY) च्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
FARMER

FARMER

जर तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हरियाणा सरकारने 'मुख्यमंत्री फलोत्पादन विमा योजने'अंतर्गत फळबाग पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एमएल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी हरियाणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. अधिकृत निवेदनात  म्हटले  आहे  की, मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री फलोत्पादन विमा योजना (MBBY) च्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे.

पिकाचे नुकसान झाल्यास मिळणार आर्थिक मदत :

प्रतिकूल हवामान आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या नुकसानीसाठी फळबागांची पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाईच्या  हमीवर ही  योजना  आधारित  आहे. फळबाग  लागवड  करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पिकांमध्ये रोग, अवकाळी पाऊस, वादळ, दुष्काळ आणि तापमानात वाढ यासारख्या आपत्तीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, साखर आयुक्तालयानी केली नवीन तयार कल्पना,आता साखर कारखाण्याचे व्यवहार होणार उघड

विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भाजीपाला आणि मसाल्याच्या पिकासाठी नाममात्र 750 रुपये आणि फळ पिकासाठी 1,000 रुपये मोजावे लागतील, त्या बदल्यात त्यांना अनुक्रमे 30,000 आणि 40,000 रुपयांचा विमा दिला जाईल.योजनेअंतर्गत, विमा दाव्याचा निपटारा  करण्यासाठी एक सर्वेक्षण केले जाईल, ज्याअंतर्गत पीक नुकसानीचे मूल्यांकन  चार श्रेणींमध्ये  25  टक्के 50 टक्के, 75 आणि 100 टक्के केले जाईल. ही योजना ऐच्छिक असेल आणि राज्यभर लागू होईल.

आपल्याला अशा प्रकारे नोंदणी करावी लागेल:

योजना स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या पीक आणि क्षेत्राचा तपशील देत मेरी फसल मेरा ब्योरा पोर्टलमध्ये नोंदणी करावी लागेल. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत, राज्य सरकार, राज्य आणि जिल्हास्तरीय समित्यांद्वारे योजनेसाठी 10 कोटी रुपयांचे बीज भांडवल ठेवले जाईल.

English Summary: Under this scheme, Baliraja will get Rs. 40,000. Find out who will get the benefit Published on: 29 September 2021, 05:10 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters