1. बातम्या

नाशिकमध्ये भूकंपचे झटके! भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण, जाणुन घ्या भूकंप आल्यावर काय करावे

पश्चिम महाराष्ट्रातील नासिक मध्ये रविवारी सकाळी भूकंप आल्याचे वृत्त समोर येत आहे. रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ही 3.9 एवढी मोजली गेली. सकाळी सकाळी लोक गाढ झोपेत असताना भूकंपचे झटके आल्याचे सांगितले जात आहे. भूकंपाचे झटके आल्यानंतर लोकांनी आपल्या घराबाहेर धाव घेतली. यासंदर्भात अधिक माहिती अशी समोर येत आहे की भूकंप मुळे कुठल्याही प्रकारची जीवीतहानी तसे वित्तहानी घडले नसल्याचे समोर येत आहे. भूकंपचे झटके पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी आले असल्याचे सांगितलं जात आहे. सेस्मोलॉजी विभाग नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हा नासिक पासून 88 किलोमीटर लांब होता. आतापर्यंत भूकंपामुळे कुठल्याही प्रकारची नुकसानीची बातमी समोर आलेली नाही.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
how to deal earthquake

भूकंप आल्यावर काय करावे आणि काय नाही

भूकंप एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि आपण याचा अंदाज लावण्यास असमर्थ असतो, आपल्यासाठीच नव्हे तर वैज्ञानिकांसाठी देखील भूकंपाचा अंदाज बांधणे कठीण काम आहे. भूकंप ही एक अशी नैसर्गिक आपदा आहे, जी सांगून येत नाही. त्यामुळे अचानक येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी जीवितहानी व वित्तीयहानी होण्याचा धोका बनलेला असतो. पण आपण सावधानता बाळगून या नैसर्गिक आपत्तीचा सामना करू शकतो. आज आपण भूकंप आल्यावर नेमक्या कुठल्या गोष्टी कराव्यात आणि काय करू नये हे जाणून घेणार आहोत.

  • भूकंपचे झटके समजताच सर्वात आधी आपण जिथे असाल तेथून एखाद्या मोकळ्या ठिकाणी जाऊन उभे राहावे. भूकंप आला असता घरात ऑफिस मध्ये थांबू नये, तसेच मोठमोठ्या बिल्डींग, विजेचे खांबे इत्यादी पासून लांब राहावे.
  • जर आपण मोठ्या बिल्डिंग मध्ये राहत असाल तर अशा वेळी उतरताना लिफ्ट चा उपयोग करणे टाळावे, याऐवजी आपण पायऱ्यांचा अथवा जिन्याचा वापर करू शकता.
  • जर आपण अशा एखाद्या ठिकाणी असाल जिथून बाहेर निघून काही फायदा होणार नसेल तर आपण तिथेच एखाद्या सुरक्षित जागी थांबावे. विनाकारण पळापळ करू नये यामुळे फायदा तर काही होणार नाही पण नुकसान होण्याची जास्त शक्यता असते.
  • भूकंप आल्यावर खिडकी, कपाट, पंखे, पडदीवर असलेले जड सामान इत्यादी पासून लांबच राहावे, नाहीतर आपणांस दुखापत होऊ शकते.
  • भूकंप आल्यावर ज्या भिंतीवरती फोटो, घड्याळ इत्यादी वस्तू टांगलेला नसतील त्याला लागून गुडघ्यावर बसावे. तसेच डोक्यावर पुस्तक किंवा एखादी सुरक्षित वस्तू ठेवावी.
  • दरवाजा पासून लांब राहावे नाहीतर दरवाजामुळे आपणास दुखापत होऊ शकते.
  • जर आपण गाडीवरती असाल तर गाडी ही बिल्डिंग, फ्लाय ओवर, खांबे, पूल इत्यादी पासून लांब रस्त्यालगत किंवा मोकळ्या जागेत पार्क करावी आणि भूकंप थांबण्याची वाट पाहावी.
English Summary: in nashik earthquake took place in morning know how to deal earthquake Published on: 26 December 2021, 05:22 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters