सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला पोहोचत असल्यामुळे बऱ्याच लोकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहने वापरण्याकडे वाढला आहे.
परंतु इलेक्ट्रिक वाहन वापरताना सगळ्यात मोठी समस्या ही चार्जिंगची आहे. याच पार्श्वभूमीवर सुंदर मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ केला. टाकाऊ अन्न कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशन ची जोड देण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे हा देशातील पहिलाच चार्जिंग स्टेशन असून या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
या प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे काय म्हणाले?
या प्रकल्पाबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की फूड वेस्ट मधून निर्मित विजेचा वापर करून इलेक्ट्रिकल चार्ज करणारे भारतातील हे पहिले केंद्र आहे. अशा स्वरूपाचे केंद्र राज्यात काही शक्य होईल त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेषतः हायवे वर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल.
त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना तर मिळेलच सोबत सेंद्रिय जैविक स्वरूपाच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करता येईल असे त्यांनी नमूद केले. यामध्ये महानगरपालिकेचा डी विभाग आणि एरोकेअर क्लिन एनर्जी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला आहे. केशवराव खाडे मार्गावर मीनाताई ठाकरे उद्यानाजवळ महापालिकेने टाकाऊ अन्नापासून वीज निर्मिती प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सप्टेंबर 2021 मध्ये करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे दीड लाख किलोपेक्षा अधिक टाकाऊ अन्नपदार्थ वर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्यात आली आहे.
स्वस्तात होणार चार्जिंग
या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणारी वीज इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी उपयोगात येणार आहे. या प्रकल्पाला जोडून इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे त्याचे लोकार्पण देखील आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
चार्जिंग करण्यासाठी दोन पॉईंट या ठिकाणी असून एका वेळी दोन वाहने जलद गतीने चार्ज होऊ शकतात व अगदी माफक दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
Share your comments