मसाल्यांना महागाईचा ठसका; मिरची जिऱ्याच्या दरात मोठी दर वाढउन्हाळ्याची चाहूल लागताच महिला वर्गाला मसाले बनवण्याचे वेध लागतात. पारंपरिक पद्धतीने मसाले तयार करणे हे चित्र घरोघरी पाहायला मिळते. शिवाय भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मसाल्यांचे मोठे स्थान असून पूर्वीपासून भारतीय जेवणात मसाल्यांचा वापर केला जात असतो. त्यामुळे सध्या मसाले स्वस्त मिळतील या भावनेने महिला मसाला खरेदीसाठी विचारणा करू लागल्या आहेत.
मात्र, मसाल्यांच्या दरात वाढ झाल्याने गृहिणी निराश होऊन रिकाम्या हाती परतत आहेत.मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये उन्हाळी मसाले तयार करण्याकरिता मसाले खरेदीला महिला फिरू लागल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात मसाले पदार्थ महाग होतात. शिवाय प्रचंड गर्दी होऊन मसाले दळण्यासाठी रांगा लावाव्या लागून नयेत म्हणून महिला मसाला बाजारभाव चौकशी करू लागले आहेत. मसाले पीक काढण्याच्या तयारीत असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे काढणीवर आलेली मिरची खराब होऊन आतील भाग पाण्यामुळे काळवंडला आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण पीक नष्ट झाले होते. त्यामुळे मिरचीसह अन्य मसाला पिके प्रमाणापेक्षा कमी उत्पादित झाली आहेत. त्यामुळे मालाचा पुरवठा कमी होऊन मिरचीसह अन्य मसाल्यांचा तुटवडा निर्माण होउन मसाल्याचे दर वाढले आहेत.
परदेशातून आपल्या देशात मसाले आयात केले जातात. मात्र, गेली काही वर्षांपासून आयात धोरणामुळे पुरेशा प्रमाणात मसाले आयात होत नाहीत. त्यामुळे मसाल्यांची मागणी जास्त व पुरवठा कमी होत आहे. तर निसर्गाच्या लहरीपणामुळे देशांतर्गत उत्पादीत होत असलेले मसाला पदार्थ पुरेशा प्रमाणात उत्पादित झाले नाहीत. परिणामी मसाल्यातील मिरची काही प्रमाणात महाग झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर या महिना अखेरपर्यंत मिरची ५० ते ६० रुपये किलोने स्वस्त होईल असा अंदाज मसाला व्यापारी अमरीशलाल बारट व्यक्त केला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील काही प्रमुख मसाला पदार्थांचे दर प्रतिकिलो
काश्मीरी मिरची : ४५० ते ५५०
तेजा मिरची : २०० ते २२५
दालचिनी : २५० ते २७०
मिरी (काळी मिरची: ५२५ ते ५७०
धने : १४० ते १८०
खसखस : १४०० ते १५००
जिरे : २०० ते २२५
मोहरी : ८० ते ८५
तेज पत्ता : ६० ते ७०
चक्रीफूल ६५० ते ७२५
तीळ : १३५ ते १५०
Share your comments