कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कटती च्या नावाखाली कमी वजन आकारले जाते. परंतु कुठल्याही कारणाविना प्रति क्विंटल मागे 300 ग्रामची कपात अकोट बाजार समितीमध्ये केली जात आहे.
नेमकी ही कपात करण्यामागील कारण काय हे शेतकर्यांना कुठल्याही प्रकारे सांगितले जात नाही.मागील बऱ्याच दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांनी या गोष्टीला विरोध केला आहे. या मुद्द्यावर शेतमाल खरेदीदार आणि शेतकरी यांच्यामध्ये वाद वाढल्याने चक्क बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवावे लागले आहेत.जोपर्यंत ह्या गोष्टीवर नाही तोडगा निघत नाही तोपर्यंत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकानेघेतला आहे. अगोदर शेतकरी त्रस्त असताना अशा प्रकारच्या गोष्टींमुळे त्यांच्या समस्यांमध्ये भरच पडत आहे.
या प्रकरणात जिल्हा उपनिबंधकांची मध्यस्ती
सध्या हा प्रकार चांगलाच चर्चेत आहे.याप्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत असून प्रकरणांमध्ये चक्क जिल्हा उपनिबंधक यांना हस्तक्षेप करावा लागला होता.जर शेतमालाच्या पोत्याचे वजन धरून वजन कपात केली जात असेल तर हे ठीक आहे परंतु शेतीमालाच्या बाबतीत असे होत असेल तर हे चुकीचे असून याबाबतीत उपनिबंधक विनायक कहाळेकर यांनी जिल्ह्यातील सगळ्या बाजार समितीने याबाबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु तरीसुद्धा अशा प्रकारची लूट सुरूच आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बाजूने प्रशासक उभे राहिले आहेत. शेतीमालाच्या मापा मध्ये नियमितता आणण्यासाठी शेतमाल खरेदीदारांना बाजार समित्यांनी अत्याधुनिक पद्धतीचे वजन काटे देण्याच्या सूचना केल्या आहेत.
त्यानुसार अकोट बाजार समितीनेही वजन काटे पुरवले आहेत. परंतु असे असताना देखील व्यापारीक्विंटल मागे मध्ये 300 ग्रॅम धान्य कपात का करताहेत हे अजूनही कळलेले नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या प्रकरणावर शेतकरी आणि खरेदीदार यांच्यामध्ये मतभेद झाल्याने बाजार समितीच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले जात आहे. यामुळे व्यवहारावर परिणाम होत असून या बाबतीत योग्य धोरण ठरवते तोपर्यंत व्यवहार बंद राहणार आहेत.
Share your comments