महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमात सुधारणा करणार

Friday, 20 December 2019 08:48 AM


नागपूर:
एलईडी दिवे व पर्ससिन नेटद्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 मध्ये काळानुरुप बदल करण्यात येणार असून नवीन नियमांची कडक अंमलबजावणी करणार असल्याची घोषणा पशुसंवर्धनमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत केली. तसेच वादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना मदतीसाठी 5 कोटी रुपयांचे तातडीने वितरण करण्यात येणार असून आवश्यक असल्यास आणखी निधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सदस्य श्रीमती हुस्नबानो खलिफे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर श्री. थोरात बोलत होते. ते म्हणाले, एलईडी दिवे लावून व पर्ससिन नेटद्वारे मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी अशा प्रकारे मासेमारी केली जाते. त्यावर मत्स्य संवर्धन विभागामार्फत कारवाई केली जाते. मात्र, या प्रकाराला आळा घालण्यासाठी अधिनियमात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासन लवकरच कार्यवाही करणार आहे. त्यामध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार केला जाईल. या चर्चेत सदस्य सर्वश्री. जयंत पाटील, किरण पावसकर, भाई जगताप, अनिकेत तटकरे, रमेश पाटील आदींनी सहभाग घेतला.

पर्ससिन नेट एलईडी मासेमारी led fishing मच्छिमार fisherman fishery मासेमारी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 maharashtra marine fishing regulation act 1981

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.