भारतात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याचे (onion) दर सतत खाली उतरत असताना पाहायला मिळाले. मागच्या काही दिवसांमध्ये कांद्याला दर 1500 रुपयांपर्यंत मिळत होता. आता यामध्ये सुधारणा झाली आहे.
कांद्याचे सध्याचे बाजार भाव पाहता कांद्याला हळूहळू चांगला भाव मिळताना दिसत आहे. कांद्याच्या कमाल भावामध्ये सुधारणा झाली असल्याचे बाजारभावावरून लक्षात येत आहे. अशीच हळूहळू कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (Agricultural produce market) कांद्याला सर्वाधिक 3200 रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे. हा दर शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Onion Market Price) इथे मिळाला आहे.
महत्वाची बातमी! IFFCO ने डीएपी आणि युरियाच्या नवीन किमती केल्या जाहीर
काल शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथे नंबर एक कांद्याची 1200 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 2 हजार रुपये, कमाल भाव 3 हजार 200 आणि सर्वसाधारण भाव 2 हजार रुपये इतका मिळाला आहे.
या खालोखाल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला (Onion Market Price) सर्वाधिक 3 हजार रुपयांचा भाव मिळालेला आहे. काल संध्याकाळपर्यंत सोलापूर बाजार समितीमध्ये 12 हजार 102 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.
मिथुन, मीन, कन्या राशीच्या लोकांना मिळणार चांगली संधी; नशिबाचीही साथ लाभणार
यासाठी किमान भाव 100 रुपये कमाल भाव 3 हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव 1 हजार 100 रुपये इतका मिळाला. तर सर्वाधिक आवक ही पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) झाली असून हे आवक 13,151 क्विंटल इतकी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
सावधान! तुम्ही नकली आले तर वापरत नाही ना? असे ओळखा अस्सल आणि नकली आले
दिलासादायक! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वाटप
पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून आज 15 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
Share your comments