1. बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना! भाजीपाला निर्यात करायचा असेल तर लागणार या कागदपत्रांची आवश्यकता

सध्या शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आपल्या शेतामध्ये भाजीपाला पिकाकडे ओळलेला आहे. जे की पारंपरिक धान न पिकवता शेतकरी आता आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या पिकवत आहे. जे की शेतकऱ्याने आपला कल तरकारी कडे फिरवला आहे. पारंपारिक पिकाला उगवण्यास जास्त दिवस लागतात तसेच कधी कधी निसर्गाच्या संकटामुळे शेतात पिकवलले सर्व पिकाचे नुकसान होते त्यामुळे शेतकरी अगदी कमी होते कालावधीत जास्त उत्पन्न घेण्याच्या मार्गावर आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे

सध्या शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आपल्या शेतामध्ये भाजीपाला पिकाकडे ओळलेला आहे. जे की पारंपरिक धान न पिकवता शेतकरी आता आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या पिकवत आहे. जे की शेतकऱ्याने आपला कल तरकारी कडे फिरवला आहे. पारंपारिक पिकाला उगवण्यास जास्त दिवस लागतात तसेच कधी कधी निसर्गाच्या संकटामुळे शेतात पिकवलले सर्व पिकाचे नुकसान होते त्यामुळे शेतकरी अगदी कमी होते कालावधीत जास्त उत्पन्न घेण्याच्या मार्गावर आहे.

शेतकऱ्याचा कल भाजीपाला व्यवसायाकडे :-

अगदी कमी दिवसामध्ये शेतात भाजीपाला पिकवून शेतकरी जवळच्या असणाऱ्या मार्केट ला पाठवतो आणि त्यामधून पैसे कमवत आहे. के की पारंपरिक पिकापेक्षा शेतकऱ्याला भाजीपाला पिकामधून जास्त पैसे भेटतात त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी आता आपल्या शेतात भाजीपाला पिकवू लागलेत आणि दुसरीकडे निर्यात करू लागले आहेत. मात्र आता आता तुम्हाला जर भाजीपाला निर्यात व्यवसायामध्ये पडायचे असेल तर आता शेतमाल आयात निर्यात परवाना काढावा लागणार आहे. जे की हा परवाना काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे.

हेही वाचा:-चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून करतायत मस्त्यपालन शेती, मोठ्या प्रमाणावर काढतायत अर्थिक उत्पन्न

आयात निर्यात परवाना काढण्यासाठी लागणारी कागडपत्रे :-
१. संस्था नोंदणी प्रमाणपत्र तसेच आयकर विभागाकडून मिळणारा खाते क्रमांक व त्याची प्रत. तसेच बँकेच्या लेटरवर प्रमाणपत्र.
२. दोन पासपोर्ट साईझ फोटो तसेच बँकेच्या प्रपत्रावरील पासपोर्ट साईझ फोटो वर अधिकाऱ्याची सही.
३. सहसंचालक विदेश व्यापार यांच्या नावे इंग्रजी मध्ये लिहलेल्या १ हजार रुपयांचा पुणे किंवा मुंबई येथील राष्ट्रीयकृत बँकेमध्ये देय असणारा डिमांड ड्राफट तसेच प्रपत्रानुसार घोषणपत्र आवश्यक असणे गरजेचे आहे.
४. A4 आकार साईझचे पाकीट व तीस रुपयांचा पोस्टल स्टॅम्प.
५.अर्ज सोबत माहिती व त्याचे नमुने http://dgft.delhi.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रपत्रातील तपशीलवर सर्व माहिती भरून अर्जदाराने सहसंचालक विदेशी व्यापाऱ्यांच्या पुणे व मुंबई मधील कार्यालयात जाऊन स्वतः किंवा टपाल सेवेने सर्व कागदपतत्रासोबत अर्ज करणे गरजेचे आहे.
६. आयात निर्यात परवाना तुम्हाला मिळाला की त्या नंतर निर्यात वृद्धी परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे आहे. मात्र यासाठी कृषीमाल व प्रक्रिया पदार्थ निर्यायीसाठी अपेडा नवी दिल्ली यांच्या कार्यलयात किंवा अपेड च्या वेबसाईट वर नोंदणी करता येते.

हेही वाचा:-जाणून घ्या लिंबाचे लोणचे खाण्याचे जबरदस्त फायदे, वाचून बसणार नाही विश्वास.

 

शेतमाल सुरक्षतेबाबत हमी देण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

१. ग्लोबल गॅप सर्टिफिकेट
२. आरोग्यविषयक प्रमाणपत्र
३. ऍगमार्क प्रमाणपत्र
४. सॅनिटरी प्रमाणपत्र.
याप्रकरची सर्व प्रमाणपत्रे तुम्हाला काढावी लागणार आहेत.

English Summary: Important notice for farmers! These documents are required if you want to export vegetables (2) Published on: 18 September 2022, 02:18 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters