दिवसेंदिवस घटत असनारे उन्हाळी कांद्याचे दर आणि बाजारात वाढती आवक यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात थेट कांदा घेऊन जाण्यावर भर दिला आहे. कांदा हे पीक नाशवंत पीक म्हणून ओळखले जाते जे की वाढत्या उन्हामुळे कांदा लवकर खराब होतो त्यामुळे दर कमी असले तरी चालतील पण कांदा खराब होऊन द्यायचा नाही म्हणून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीवर भर दिलेला आहे. परंतु आता पुढील ५ दिवस शेतकऱ्यांना कांदा विकता येणार नाही. मार्च ऐंडींग तसेच सण आणि साप्ताहिक सुट्यांमुळे लासलगाव सोबतच पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसोबतच जिल्ह्यातील जवळपास १७ बाजार समित्याचा लिलाव बंद राहणार आहे. कांद्यासोबतच धानाचे देखील व्यवहार बंद राहणार असल्यामुळे सुमारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल बंद राहणार आहे. सध्या कांद्याबरोबरच रब्बीमधील हरभरा, सोयाबीन व तुरीची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होती मात्र आता पाच दिवस बाजारपेठ बंद राहणार आहे.
5 दिवसानंतर काय राहणार चित्र :-
मागील महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण होत चालली आहे. खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक सुरू असताना कांद्याला मागणी तर मोठ्या प्रमाणात होतीच पण सोबतच दर देखील चांगले भेटले होते. सध्या उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली आहे. जो ३ हजार रुपये प्रति क्विंटल कांदा होता तो थेट १ हजार रुपये वर आलेला आहे. राज्यातील लासलगाव, पिंपळगाव तसेच सोलापूर मधील मुख्य बाजार समित्यांमध्ये अशी अवस्था निर्माण झालेली आहे. जो चांगला प्रतीचा कांदा आहे त्यास १ हजार रुपये दर तर सर्वसाधारण कांद्याला ८०० रुपये दर भेटत आहे. जरी ५ दिवस लिलाव बंद राहिला तरी जास्त असा काय परिणाम होणार नसल्याचे व्यापारी सांगतात. मागणीमध्येच घट झाली असल्यामुळे दर वाढतील असे काय नाही.
दुष्काळात तेरावा :-
मार्च महिना संपतच आला आहे तरी सुद्धा कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. तर बाजारात उन्हाळी कांद्याची आवक सुरू आहे. कांद्याच्या दरात रोज घसरण होत असल्यामुळे कांद्याचे दर एक हजार रुपये वर आलेले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी सध्या तोट्यात कांदा विक्री करत असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिना ऐंडींगमुळे बँकेतून पैसे भेटत नसल्यामुळे बाजार समित्यामधील कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत.
कोट्यावधीची उलाढाल ठप्प :-
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, लासलगाव या बाजार समित्या कांद्यासाठी प्रसिद्ध मानल्या जातात. दर दिवशी इथे ४०० - ५०० वाहने कांदा दाखल होतो. मात्र आता सलग पाच दिवस जिल्ह्यातील १७ बाजार समित्याचे व्यवहार बंद राहणार आहेत. सध्या रब्बी हंगामातील हरभरा, सोयाबीन आणि तुरीची आवक चालू होती त्याचवेळी बाजार समिती बंद राहणार आहेत. पुढील पाच दिवसात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प पडणार आहेत.
Share your comments