1. बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शेतीबियाणांवर कर लागल्याने बियाणांच्या किमतीमध्ये होणार वाढ, जाणून घ्या यामागील करण

भारत देशामध्ये शेतीच्या क्षेत्रावर कोणत्याही प्रकारचा कर आकाराला जात नाही. त्यामुळे कृषी क्षेत्र अगदी व्यवस्थित स्वरूपात चालले होते मात्र आता कृषी क्षेत्राचा महत्वाचा भाग जे की यामुळे च पीक येते असे बी-बियाणांवर आता वस्तू व सेवा कर आकारला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तेलंगणा राज्याच्या ॲथॉरीटी ऑफ ॲडव्हान्स्ड रुलिंगने जे दोन आदेश दिले आहेत त्या आदेशात असे स्पष्ट केले आहे की बी-बियाणांवर कर लावण्यात येणार आहे. बि-बियाणे हे काय कृषी उत्पादन नसल्याचे त्यांनी सांगितले आहे की त्यामुळे आता बियाणांवर वस्तू व सेवा कर लागू करणार आहे असे एएआरने म्हणजेच ॲथॉरीटी ऑफ ॲडव्हान्स्ड रुलिंगने सांगितले आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
seeds

बियाणांचा समावेश वस्तू व सेवा क्षेत्रात :-

जर बियाणांचा समावेश वस्तू व सेवा कर क्षेत्रामध्ये केला तर पुढे भविष्यात कृषी क्षेत्राबद्धल अनेक अडचणी व समस्या वाढणार असल्याची शक्यता दर्शवली गेली आहे. बियाणे हे धान्यापासून वेगळी आहेत असे ॲथॉरीटी ऑफ ॲडव्हान्स्ड रुलिंगने स्पष्ट केले असून ११ फेब्रुवारी रोजी जो आदेश काढण्यात आला त्यामध्ये असा उल्लेख केला गेला आहे की धान्य आणि बियाणे या स्वतंत्र गोष्टी आहेत. ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या उत्पादित धान्याला कर सवलत दिली गेली आहे त्याप्रकारे ही कर सवलत बियाण्याला देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बियाणे कृषी क्षेत्राशी निगडित आहेत पण आपण खातो कुठे :-

ॲथॉरीटी ऑफ ॲडव्हान्स्ड रुलिंगने म्हणले आहे की दोन्ही संस्था लागवडीनंतरच्या कमोडिटीज विकत आहेत. तसेच शेतीसाठी लागणारे जे बियाणे आहेत त्यांचे उत्पादन करण्यामध्ये आणि विक्रीमध्ये महामंडळाचा सुद्धा सहभाग आहे. ॲथॉरीटी ऑफ ॲडव्हान्स्ड रुलिंगने सांगितले आहे की बियाणांच्या उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी सफाई तसेच वाळवणे, प्रतवारी यासारखी कामे बाहेरून करून घेतली जात आहेत. शेती क्षेत्रात फक्त अन्न, तंतुमय पदार्थ तसेच जे ग्राहकांना उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच गोष्टींचा समावेश होतो. आपण जे खातो त्यास कर नाही मात्र आपण बियाणे कुठे खातो यामुळे यांचा समावेश वस्तू तसेच सेवा क्षेत्रात होत आहे असा आदेश एएआरने दिला आहे.

सर्वांचे लक्ष आता बियाणांच्या करावर :-

भारतात कृषी क्षेत्र कर प्रणाली मधून वेगळे काढण्यात आले आहे तसेच आजपर्यंत बि बियाणे या गोष्टी सुद्धा कृषी उत्पादनाशी तसेच कृषी क्षेत्राशी संलग्न असल्यामुळे जीएसटीपासून दूर ठेवण्यात आल्या होत्या असे कृषी क्षेत्रातील अनेक लोकांनी सांगितले आहे. मात्र आतापासून बि बियाणांवर कर लागू करणार असल्याची शक्यता वर्तविली गेली आहे. सध्या सर्वांचे लक्ष याच निर्णयाकडे लागले आहे की बी बियाणांवर नक्की जीएसटी लागतेय की नाही.

English Summary: Important news for farmers! Tax on agricultural seeds will increase the price of seeds, find out the reason behind this Published on: 24 February 2022, 05:58 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters