निसर्गतः जमिनीमध्ये जीवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. जीवाणूंचे प्रमाण अधिक असलेल्या मातीला जिवंत माती असे म्हटले जाते. मातीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणे गरजेचे आहे.
जैविक खते म्हणजे काय? : प्रयोगशाळेत उपयुक्त कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररीत्या वाढ करून योग्य वाहकता मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला "जीवाणू खत', "जीवाणू संवर्धन', "बॅक्टेरीयल कल्चर' किंवा बॅक्टेरियल इनॉक्युलंट म्हणतात.
नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जीवाणूंचा वापर करता येतो, त्यांना जैविक खते असे म्हणतात. शेतात असणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा जलदरीत्या विघटनासाठी ते उपयुक्त ठरतात.
जैविक खतांचे फायदे :
- जैविक खतांमुळे रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होऊन, त्यात बचत होऊ शकते.
- जैविक खते पर्यावरणपूरक आहेत.
- जैविक खतांमुळे बियाण्याची उगवणशक्ती वाढते.
- जैविक खते सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबरच जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन इन्डॉल ऍसिटीक ऍसिड, यासारखी संप्रेरके व विटामीन "बी' झाडांना मिळवून देतात.
- जैविक खतांद्वारे जमिनीत प्रतिजैविके सोडली गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य रोगांचेदेखील नियंत्रण होते.
शेतकऱ्यांचे यांत्रिकीकरण आहे गरजेचे
उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते, तसेच उत्पादन खर्च कमी होतो.
जैविक खतांचे प्रकार :
१. नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू - रायझोबियम, ऍसिटोबॅक्टर, ऍझोटोबॅक्टर, अझोस्पिरीलम, निळे-हिरवे शेवाळ, ऍझोला
२. स्फुरद विरघळविणारे जीवाणू
३. पालाश विरघळविणारे जीवाणू
४. सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू
५. सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू
प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी एक हजार कोटी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू :
रायझोबियम:या जीवाणूंचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते. हे जीवाणू कडधान्यवर्गीय पिकांच्या मुळामध्ये स्थिर होऊन गाठी बनवतात. मुळावर वाढलेले जीवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात.
एकाच प्रकारचे रायझोबियम जीवाणू खत सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाहीत. त्यामध्ये वेगवेगळे सात गट आहेत. वेगवेगळ्या गटातील विशिष्ट पिकांना त्याच गटाचे रायझोबियम जीवाणू खत वापरावे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो केळी काळी का पडतात? वाचा सविस्तर..
कांद्याच्या दरासाठी आता अजित पवार आक्रमक, सभागृहात केली मोठी मागणी..
फळबाग लागवडीपूर्वी मातीचे परीक्षण गरजेचे, पीक वाढीस ठरेल उपयुक्त
Share your comments