जनतेची लढावू वृत्ती कायम ठेवणे महत्वाचे

25 March 2020 11:22 AM


नवी दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रित प्रसारमाध्यमांच्या 20 पेक्षा अधिक प्रतिनिधी आणि हितसंबंधी व्यक्तींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यमातल्या अकरा विविध भाषांमधल्या वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी 16 विविध ठिकाणांहून या संवादात सहभागी झाले होते.

देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत माहिती पोहचवण्यात प्रसारमाध्यमे बजावत असलेली भूमिका अतिशय कौतुकास्पद आहेअसे पंतप्रधान यावेळी म्हणाले. प्रसारमाध्यमांचे जाळे देशभर पसरले असूनते सर्व शहरे आणि गावात देखील पोहोचले आहेतअसे त्यांनी सांगितले. त्यामुळेचकोरोनाच्या आव्हानाचा सामना करतानाप्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असूनअगदी तळागाळापर्यंत ते यासंदर्भातली अचूक माहिती पोचवू शकतातअसं पंतप्रधान म्हणाले. 

वृत्तपत्रांची विश्वासार्हता मोठी असूनस्थानिक बातम्यांची पाने त्या त्या प्रदेशात खूप वाचली जातात. त्यामुळेया पानांवर कोरोनाविषयी जनजागृती करणारी माहितीलेख प्रकशित केले जावेतअसे मोदी म्हणाले. कोरोनाची तपासणी केंडे कुठे आहेतयाची चाचणी नेमकी कोणी करावीचाचणी करण्यासाठी कोणाशी संपर्क साधावाघरात विलगीकरण सांगितले असल्यासकोणती काळजी घ्यावीही माहिती लोकांपर्यंत पोहचवणे अत्यंत आवश्यक आहे. ही माहिती वृत्तपत्रांनी मुद्रित आणि ऑनलाईन आवृत्यांमधून प्रसिद्ध करावीअसे मोदी म्हणाले. जमावाबंदी/संचारबंदी सारख्या नियमनाच्या काळात, अत्यावश्यक वस्तू कुठे मिळतीलत्या ठिकाणांची सविस्तर माहिती देखील वृत्तपत्रांनी द्यावीअसे आवाहन त्यांनी केले.

प्रसारमाध्यमांनी सरकार आणि जनता यांच्यातला दुवा बनावे आणि जनतेच्या प्रतिसादाच्या बातम्या त्वरित स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द कराव्यातअसे आवाहन त्यांनी केले. सामाजिक अंतर राखण्याचे महत्व अधोरेखित करतांनाचत्यांनी माध्यमांनाही त्याविषयी जागृती करण्यास सांगितले. राज्यांनी घातलेल्या बंदी आणि नियमांविषयी माहिती द्यावीतसेचविषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनाआंतरराष्ट्रीय पातळीवरची आकडेवारी आणि केसेसची माहिती वाचकांना द्यावीअसे पंतप्रधान म्हणाले.

या संकटाचा सामना करण्यासाठी जनतेमधील लढावू वृत्ती कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहेअसे सांगतांनाचालोकांमध्ये भीतीनिराशा आणि नकारात्मक भावना निर्माण होणार नाहीयाचीही काळजी घेतली जावीअशी सूचना पंतप्रधानांनी केली. अफवांचा प्रसार रोखण्यातही प्रसारामाध्यमांनी मदत करावी असे ते म्हणाले. सरकार कोविड-19 चा मुकाबला करुनया संकटावर मात करण्यासाठी कटिबद्ध आहेहा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावेअसे त्यांनी सांगितले.

अशा संकटकाळात सर्वांशी संवाद साधणे आणि सक्षमपणे देशाचे नेतृत्व करत असल्याबद्दल पत्रकारांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून जनतेपर्यंत योग्य माहिती पोहचवली जाईलअसे या प्रतिनिधींनी सांगितले. विशेषतः कोरोनाविषयीच्या सकारात्मक बातम्यांना प्राधान्याने प्रसिद्धी दिली जाईल. असेही ते म्हणाले. मुद्रित प्रसारमाध्यामांची विश्वासार्हता अधोरेखित केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होताअशी आठवण देखील या प्रतिनिधींनी दिली.

या प्रतिसादाबद्दल पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले आणि वंचित वर्गांविषयी प्रसारमाध्यमांची विशेष जबाबदारी असल्याचे स्मरण त्यांनी करुन दिले. अशा संकटांवर मात करुन समाज सुरक्षित ठेवण्यासाठी सामाजिक एकजिनसीपणा अत्यंत महत्वाचा आहेअसे पंतप्रधान म्हणाले. या आजाराचा सामना करण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहितीदेशापर्यंत पोहचवूनसमाजात भीती आणि अफवा पसरणार नाहीयाची काळजी घेतल्याबद्दलकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आणि या खात्याचे सचिव यांनीही यावेळी या संवादात भाग घेतला.

narendra modi covid 19 Coronavirus corona कोरोना नरेंद्र मोदी कोविड 19
English Summary: Imperative to keep the fighting spirit of people up

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.