![iffco get petant for 20 year to nano dap and nano urea production](https://kjmarathi.b-cdn.net/media/19070/nd.jpg)
iffco get petant for 20 year to nano dap and nano urea production
इंडियन फार्मर फर्टीलायझर को-ऑपरेटिव लिमिटेड अर्थात इफकोला जगातील तीनशे महत्त्वाच्या सहकारी संस्थांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला असून नॅनो डीएपी आणि नॅनो युरियाचे पेटंट मिळाले आहे.
पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना नॅनो डीएपी उपलब्ध होईल. नॅनो डीएपी हे पारंपारिक डीएपी च्या तुलनेत फायदेशीर व पर्यावरणपूरक तसेच पिकांसाठी खूपच महत्त्वपूर्ण असेल.
नॅनो युरिया उपलब्ध केल्यानंतर भारताने नॅनो डीएपीच्या बाबतीत देखील चांगले काम केले असून जगातील कुठल्याही देशाला हे काम करता आले नाही ते काम भारताचे शास्त्रज्ञांनी करून दाखवले.
हे काम खत उद्योगात गेमचेंजर उत्पादन ठरणार असून याही पुढचं पाऊल इफको टाकत असून आता नॅनो झिंक आणि नॅनो कॉपर देखील विकसित करत आहे.
शेतकरी जेव्हा नॅनो डीएपी चा वापर करू लागतील तेव्हा शेतीसाठी लागणारा खर्च कमी होईल व भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करेल.
इफकोच्या या यशाबद्दल इफको चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उदय शंकर अवस्थी यांनी सांगितले की, हे पेटंट 20 वर्षांसाठी मिळाले असून नॅनो डीएपी देखील 500 मिली च्या बॉटल मध्ये उपलब्ध होईल.
याचा अर्थ 50 किलोच्या डीएपी च्या गोणीऐवजी शेतकऱ्यांना केवळ पाचशे मीलीची बाटली बाजारात मिळणार असून शेतापर्यंत वाहतुकीचे कष्ट देखील वाचणार आहे.
नक्की वाचा:Udyog Tips:बिटवर करा प्रक्रिया आणि बनवा 'हे' तीन पदार्थ, मिळेल भरपूर नफा
याठिकाणी होईल उत्पादन
नॅनो डीएपी चे उत्पादन गुजरात राज्यातील इफको चा कलोल विस्तार युनिट, कांडला आणि ओडिशातील पारादीप युनिटमध्ये केले जाणार असून दररोज 500 मिली नॅनो डीएपी च्या दोन लाख बाटल्या तयार केल्या जातील.
कलोल युनिटमध्ये मार्च 2023, पारादीप युनिटमधून जुलै 2023, आणि गुजरात राज्यातील कांडला युनिटमधून ऑगस्ट 2023 पर्यंत उत्पादन सुरू होणार आहे.
Share your comments