शेतकऱ्यांनो तुमची जमीन जर एखाद्या सरकारी प्रकल्पामध्ये जसे की,धरण, महामार्ग किंवा इतर कामांमध्ये जात असेल तर त्या जमिनीचे सरकारी बाजार मूल्य माहित असणे फार गरजेचे असते. हे सरकारी दर कसे तपासायचे याची माहिती या लेखात घेऊ.
तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर या पद्धतीने तपासा
- जमिनीचा सरकारी दर पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला gov.in या लिंक वर जायच आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होते या संकेतस्थळावर डावीकडे महत्त्वाचे दुवे हा रकाना दिसतो. यामधील मिळकत मूल्यांकन या ऑप्शन वर क्लिक करावे. यानंतर बाजार मूल्य दर पत्रक नावाचा एक नवीन पान तुमच्यासमोर ओपन होते. या पेज वर महाराष्ट्राचा नकाशा दिलेला असतो. तुम्हाला ज्या जिल्ह्यातील जमिनीचा शासकीय भाव पाहायचा आहे,त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करावे. त्यानंतर एक नवीन पान तुमच्यासमोर ओपन होईल.
- यानंतर या पेजवर सगळ्यात आधी डावीकडे वर्ष या कॉलम मध्ये तुम्हाला वर्ष निवडायचे आहे. चालू वर्षासाठी चे दर पाहिजे असेल तर 2021 -22 हे वर्ष निवडा. तिथे उजवीकडे असलेल्या लँग्वेज या रकान्यात जाऊन तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.त्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही निवडलेल्या जिल्ह्याचे नाव दिसून आपोआप आलेलंदिसेल. पुढे तालुका आणि गावाचं नाव निवडा.गावाचं नाव निवडले की खाली तुम्हाला तुमच्या गावातील जमिनीचे सरकारी भाव दिसतील.
- यामध्ये तुम्हाला सुरुवातीला असेसमेंट टाईप मध्ये जमिनीचे प्रकार दिसतात. या प्रकारानुसार पुढे ॲसेसमेंट रेंज अँड रेट म्हणजे जमिनीचा सरकारी भाव दिलेला असतो.ही जी किंमत येथे दिलेली असते ती प्रति हेक्टरी दिलेली असते.अशाप्रकारे जिरायत,बागायत, एमायडिसी अंतर्गत येणारी जमीन, हायवे वरील जमिनी यांचे सरकारी दर तुम्ही येथे पाहू शकता.
असेसमेंट रेंज नेमके काय असते?
येथे ॲसेसमेंट रेंज नुसार जमिनीचे भाव कमी किंवा जास्त होताना दिसतात. तुमच्याकडे तुमचा सातबारा उतारा असेलच. त्यात संबंधित शेतकऱ्याच्या नावासमोर त्याच्याकडे असलेले जमिनीचे क्षेत्र आणि त्यापुढे आकार दिलेला असतो. असेसमेंट रेंज काढण्यासाठी तुम्हाला आकार भागिले क्षेत्र असं सूत्र वापरायचा आहे एकदा काही असेसमेंट रेंज काढली की मग ती कोणत्या रेंजमध्ये बसते, ते पाहून तुम्ही तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी भाव जाणून घेऊ शकता.( स्त्रोत- मी eशेतकरी)
Share your comments