आता पारंपारीक शेतीमध्ये भरपूर प्रमाणात बदल घडलेला आहे जसे की ज्यामध्ये अधिक प्रमाणात उत्पन्न भेटते त्याच पिकाची शेतकरी लागवड करत असतात. औषधी वनस्पती वर जास्त भर दिला जात आहे जे की या वनस्पती उपयोगी सुद्धा पडत आहेत त्यामधून चांगल्या प्रकारे उत्पन्न भेटते.या औषधी वनस्पती मधील एक चांगली वनस्पती म्हणजे सर्पगंधक वनस्पती. सर्पगंधक वनस्पती सारख्या अशा काही वनस्पती आहेत ज्या शेतकरी भारतामध्ये जास्तीत जास्त लागवड करतात आणि त्यामधून उत्पादन काढतात. जगात अशा औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात निर्यात होते.
औषधी वनस्पतींच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहे:
जागतिक स्तरावर निर्यात होत असल्याने यामधून आपणास परकीय चलन तर भेटतेच याव्यतिरिक्त एक वेगळी ओळख सुद्धा निर्माण होते.इसबगोल ही एक अशीच औषधी वनस्पती आहे जे की भारत देशात एकूण उत्पादनपैकी ८० टक्के उत्पादन या वनस्पतीचे होते. इसबगोल ही वनस्पती औषधी वनस्पतींच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहे. प्रति वर्ष या वनस्पती ची निर्यात सुमारे १२० कोटी रुपयांची होते. इराण, इराक, अरब अमिराती, भारत आणि फिलिपाईन्स हे देश या वनस्पतीचे प्रमुख उत्पादक देश आहेत. भारतामध्ये उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यातील शेतकरी इसबगोल ची लागवड करतात.
प्रति क्विंटल 10,000 रुपये:-
ऑक्टोम्बर आणि नोव्हेंबर मध्ये रब्बी चा हंगाम. या हंगामात इसबगोल ची लागवड केली जाते आणि मार्च महिन्यात याला पीक येते. इसबगोल ची झाडे हळूहळू वाढतात आणि ती हाताने काढून घेण्याचा सल्ला दिला आहे. एकदा की या झाडाची लागवड केली की एकरी ४ क्विंटल उत्पादन मिळते.१ क्विंटल चा बाजारात दर १० हजार रुपये आहे. एक एकर मध्ये इसबगोल चे १५ क्विंटल बियाणे मिळते तसेच हिवाळ्यामध्ये याच्या किंमती वाढतात त्यामुळे अधिकच उत्पन्न मिळते. इसबगोलच्या बियानावर जर प्रक्रिया केली तर ते अधिकच फायद्यात ठरते. ही प्रक्रिया केल्यानंतर इसबगोल च्या बियांपैकी ३० टक्के बिया भुसा तयार करतात जे की हा भाग खूप महाग असतो.
इसबगोल मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत:-
इसबगोलचा जो भुसा असतो त्या भुश्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी गुणकारक सुद्धा असते. या वनस्पती मध्ये फायबर चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये चरबी आणि कोलेस्ट्रॉल कसलेच नसते. सर्व वयोगटातील व्यक्ती ही वनस्पती खाऊ शकतात.
Share your comments