त्यातच कोरोनामुळे (coronavirus) ओढावलेल्या संकटाचा फटका कमी-अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रांना बसला आहे. घरघुती अर्थसंकल्पात थोडे बदल करून आपण प्रत्येक महिन्यात खूप पैसे वाचवू शकतो. काही बदल केल्यामुळे काही रुपयांची बचत होईल आणि काहींमुळे वर्षात हजारो रुपये वाचतील.काही वेळा आपल्या लहान-मोठ्या चुकांमुळे (Financial Mistakes) बचत करूनही फायदा होत नाही. अशा चुका आपण सहज टाळू शकतो.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वत: ला बचत करण्याची शिस्त लावा. यापूर्वी आपण असंख्य वायफळ गोष्टींवर खर्च केला असेल. मात्र, सध्याच्या काळात 1-1 रुपया जपून वापरायला हवा. म्हणूनच, आपले अवाजवी खर्च कमी करुन बचत करण्याकडे अधिक कल द्या.पैशांची बचत करण्यासाठी बजेट (Budget) तयार केलं पाहिजे. तुम्हाला एकूण उत्पन्नापैकी किती पैसे खर्च करायचे आहेत आणि किती बचत करायची आहे ही गोष्ट ठरवणं बजेटमुळं सोपं होतं.
आपल्या कमाईनुसार (Earnings) खर्च (Expenses) केला पाहिजे. जेव्हा तुमचं इन्कम (Income) वाढेल तशी तुम्ही खर्चामध्ये वाढ करू शकता; मात्र इन्कम कमी असताना भरमसाठ खर्च केल्यास बचत करता येणार नाही., म्हणजेच अंथरूण पाहून पाय पसरावेत.अगोदर कमाईतली काही ठरावीक रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवणं महत्त्वाचं आहे. बचतीची रक्कम (Saving Amount) सेट न करता खर्च करत राहिल्यास कदाचित सर्व कमाईही खर्च होऊन जाऊ शकते.
पैशांशी संबंधित बाबींमध्ये पार्टनरलाही (Partner) सहभागी करून घेतलं पाहिजे. बचतीसाठी अगोदर काही रक्कम बाजूला ठेवल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पैशांमध्ये सर्व खर्च मॅनेज करावा लागतो. अशा वेळी कुठे किती पैसे खर्च करायचे आहेत याच्या नियोजनामध्ये पार्टनरची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.तुम्ही जेवण किंवा स्नॅक्स करण्यासाठी, अगदी सकाळच्या नाश्त्यासाठीसुद्धा सतत आणि वरचेवर बाहेर जात असाल, हॉटेलिंग करत असाल, तर मग तुमचा अर्थातच खाण्यावर सर्वाधिक खर्च होतो आहे. याचसाठी ही सवय मोडा.
Share your comments