1. बातम्या

नाफेडची कांदा खरेदी पारदर्शक तर मग बाजार समितीत अत्यल्प खरेदी का ?

दरवर्षी नाफेड कांदा खरेदी सुरू होताच कांदा दर वाढतात

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
नाफेडची कांदा खरेदी पारदर्शक तर मग बाजार समितीत अत्यल्प खरेदी का ?

नाफेडची कांदा खरेदी पारदर्शक तर मग बाजार समितीत अत्यल्प खरेदी का ?

अनुभव असताना यावर्षी नाफेडची कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर कांद्याचे भाव वाढण्याऐवजी उलट कमी कसे झाले.काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी नाफेडची कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने होत असल्याचे सांगितले परंतु नाफेडची कांदा खरेदी खरोखरच पारदर्शक असती तर नाशिकसह महाराष्ट्रातील विविध कांदा उत्पादक जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या कांद्याचे खरेदी होत असल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसले असते संपूर्ण महाराष्ट्रात बाजार समित्यांचे मोठे जाळे असतांना केवळ *पिंपळगाव बसवंत* आणि *लासलगाव* या दोनच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेडकडून थेट शेतकऱ्यांचा

कांदा खरेदी होत असून सदरची खरेदी ही अगदी मोजक्याच वाहनांमधून खरेदी होत आहे संपूर्ण देशातून अडीच लाख टन कांदा खरेदी पैकी महाराष्ट्रातून दोन ते सव्वा दोन लाख टन कांदा खरेदी करायची असतांनाही बाजार समितीत रोज केवळ 8 ते 10 वाहनांमधूनच नाफेडकडून कांदा खरेदी सुरू आहे उर्वरित कांदा खरेदी हा फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या फेडरेशन मार्फत सुरू असून शेतकऱ्यांना कांद्याला 18 ते 20 रुपये उत्पादन खर्च येत असतांना नाफेडकडून मात्र सरसकट 9 ते 11 रुपयानने खरेदी सुरू आहे.मोजक्याच फेडरेशनला नाफेडने कांदा खरेदी दिली आहे हीच बाब मुळात संशयास्पद असून संबंधित

फेडरेशनचा कांदा खरेदीचा पूर्वानुभव तपासल्याचे मात्र यात दिसत नाही शेतकऱ्यांच्या हितापेक्षा नाफेडच्या यावर्षीच्या कांदा खरेदीच्या माध्यमातून ठराविक घटकांनाच जास्त फायदा पोहचेल अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहेमहाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे नाफेडच्या संपूर्ण कांदा खरेदीच्या बाबतीत असंख्य शेतकऱ्यांनी संघटनेकडे तक्रारी केल्या असून नाफेडकडून पारदर्शकपणे कांदा खरेदी सुरू आहे असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांचे म्हणणे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून फेटाळण्यात येत आहे

नाफेडच्या संपूर्ण कांदा खरेदीवर महाराष्ट्र राज्य कांदा संघटनेचे बारकाईने लक्ष असून नाफेड कांदा खरेदीत होत असलेल्या भ्रष्टाचाराची पोल-खोल करू  संपूर्ण महाराष्ट्रात बाजार समित्यांचे मोठे जाळे असतांना केवळ *पिंपळगाव बसवंत* आणि *लासलगाव* या दोनच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेडकडून थेट शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होत असून सदरची खरेदी ही अगदी मोजक्याच वाहनांमधून खरेदी होत आहे संपूर्ण देशातून अडीच लाख टन कांदा खरेदी पैकी महाराष्ट्रातून दोन ते सव्वा दोन लाख टन कांदा खरेदी करायची असतांनाही बाजार समितीत रोज केवळ 8 ते 10 वाहनांमधूनच नाफेडकडून कांदा खरेदी सुरू आहे

 

भारत दिघोळे

(संस्थापक अध्यक्ष)

-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

English Summary: If NAFED's onion procurement is transparent, then why very little in the market committee? Published on: 27 May 2022, 01:23 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters