पीएम किसान सन्मान योजने अंतर्गत देशभरातील अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. दहाव्या हप्त्यानंतर आता 11 व्या हप्त्याचे वेध लागले आहेत. परंतु लाभार्थी शेतकऱ्यांसमोर (Farmer) एक वेगळी समस्या निर्माण झाली आहे. सरकारने या योजनेमध्ये नियम व अटींमध्ये बदल केले आहेत. त्याचप्रकारे 'ई-केवायसी' सुद्धा करून घ्यावी लागणार आहे. परंतु गावाखेड्यामध्ये हे करायला अडचण होणार आहे. अनेक ठिकाणी ई-केवायसीसाठी आवश्यक बायोमेट्रीक बंद आहेत. त्यामुळे उरलेल्या 20 दिवसात जर शेतकरी ई केवायसी पूर्ण करू शकले नाहीत, तर त्यांना अकरावा हप्ता मिळणार नाही. या योजनेचा दहावा हप्ता जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता.
ई केवायसीसाठी स्थानिक पातळीवर शेतकरी सीएससी केंद्रावर अवलंबून असतात मात्र त्यासाठी आवश्यक असलेले बायोमेट्रिकही बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
जर ई-केवायसी केले नाही तर 11 वा हप्ता जमा होणार नाही. शिवाय शेतकऱ्यांकडे केवळ 20 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे.
31 मार्चनंतर PM KiSAN चा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी हे गावस्तरावर जाऊन सर्व्हे करणार आहे. केवायसीसाठीही 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना आगामी 20 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ‘ई-केवायसी’ हे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सीएससी केंद्रावर जाऊन करावे लागणार आहे. परंतु या सेंटरवर शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागत आहे. ई-केवीसी ची प्रकिया सुरु असतानाच अचानक वेबसाईट अचानक बंद होत असल्यामुळे शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण होत नाहीये.
अशी करा eKYC - तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही ऑनलाईन केवायसी करू शकता अन्यथा तुम्हाला केवायसी सीएससी सेंटरवर जाऊन करावी लागेल.
- प्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
- पी. एम. किसान योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- आता तुम्हाला लाल अक्षरांमध्ये eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers.अशी सूचना दिसेल. - तुमचं आधार आणि पॅनकार्ड लिंक असेल तर ई केवायसी करू शकता. तुम्ही दोन मार्गांनी केवायसी पूर्ण करू शकता.
- आता फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करा.
- आता एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक टाका.
- त्यानंतर समोरच्या बॉक्समधील कॅप्चा कोड टाका.
- आता search या पर्यायावर क्लिक करा.
- आता नवीन पेजवर आधार नंबर तसेच त्यानंतर मोबाईल नंबर टाका.
- Get Otp या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP नंबर येईल तो OTP तेथे submit करा.
- त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला EKYC is successful submitted असा मॅसेज दिसेल. याचाच अर्थ ईकेवायसी पूर्ण झाली आहे.
Share your comments