MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

सॅटेलाईटच्या मदतीने शेतीची पाहणी करुन ICICI Bank देते पीक कर्ज

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज द्यावे, अशा आशयाच्या सूचना शासनस्तरावरून सगळ्या बँकांना देण्यात आल्या होत्या. तरीही काही बँकांनी पीक कर्ज देण्याच्या बाबतीत टाळाटाळ केली किंवा एकंदरीत पीक कर्जाच्या प्रक्रियेमध्ये उशीर झाला.

KJ Staff
KJ Staff


यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज द्यावे, अशा आशयाच्या सूचना शासनस्तरावरून सगळ्या बँकांना देण्यात आल्या होत्या.  तरीही काही बँकांनी पीक कर्ज देण्याच्या बाबतीत टाळाटाळ केली किंवा एकंदरीत पीक कर्जाच्या प्रक्रियेमध्ये उशीर झाला. परंतु याला अपवाद म्हणजे आयसीआयसीआय या खाजगी बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याच्या प्रक्रियेमध्ये होणारा वेळ दूर करण्यासाठी महत्वपूर्ण असा निर्णय घेतला. आयसीआयसीआय बँकेमध्ये शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठीचा अर्ज दिल्यानंतर जवळजवळ पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होते.  हाच प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी बँकेने आता सॅटेलाइटचा वापर करायचे ठरवले आहे.  त्यायोगे कर्ज देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल, अशा प्रकारची तयारी बँकेने केली आहे.

याबाबतीत आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची यांनी माध्यमांना माहिती दिली कि, अशा पद्धतीच्या सेवा जगभरातील मोजक्याच बँका देत आहेत. आयसीआयसीआय बँकेने एका खाजगी कंपनीच्या साह्याने ही सेवा सुरू केली आहे.  संबंधित सॅटॅलाइटचा वापर करून शेताची, त्या शेतांमधील पीक पद्धती व इतर गोष्टींची माहिती काढली जाईल.  एकूणच कर्ज प्रकरणासाठी लागणारा सर्च रिपोर्ट करण्याची ही खास पद्धत या बड्या खासगी बँकेने आणली आहे.

हे पण वाचा: Mobile App द्वारे काढा एटीएममधून पैसे; आरबीएल बँकेची सुविधा

शेती व ग्रामीण भागांमधील इतर व्यवसायांना कर्जपुरवठा करणारी आयसीआयसीआय बँक ही एक महत्त्वाची खाजगी बँक आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील समस्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडण्याची तयारी बँकेने केली आहे. आतापर्यंत या पद्धतीच्या सेवेद्वारे भारतातील 500 गावांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आलेले आहे. पुढील काळामध्ये सुमारे 63 हजार गावांमध्ये अशी सुविधा देऊन पीक कर्जाची सेवा विश्वास आर्य आणि वेगवान करण्याची तयारी बँकेने केली आहे.

             माहिती स्त्रोत- कृषी रंग

English Summary: ICICI Bank provides crop loans by inspecting agriculture with the help of satellite Published on: 09 September 2020, 06:45 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters