आयसीआयसीआय बँक शेतकऱ्यांना देणार कर्ज ; जाणून घ्या, काय आहे पात्रता

12 May 2020 03:08 PM

 

शेतकऱ्यांना कमी व्याजदरात आर्थिक मदत मिळावी. सावकरांकडून भरमसाठ व्याजदरामुळे शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाला सामोरे जावे लागत असते. यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी भारत सरकारने १९९८ मध्ये किसान क्रेडिट कार्डची सुविधा सुरु केली होती. आता या कार्डवर शेतकऱ्यांना विविध योजनांचा आणि सुविधांचा लाभ मिळत आहे. सरकारी बँकांसह आता खासगी बँकांही शेतकऱ्यांना या कार्डवरती विविध ऑफर देत आहे. आयसीआयसीआय बँकेनेही किसान क्रेडिट कार्डधारक शेतकऱ्यांना नवीन ऑफर आणली आहे.

 (Farmer Finance / Agricultural Credit)

शेती आणि शेतीसंबंधीत कामांसाठी आपल्याला पैशांची गरज असेल तर आयसीआयसीआय बँक आपली मदत करणार आहे. यासह जर आपल्याला गुरे, गाय, म्हैशी आणि सिंचनांची उपकरणे खरेदी करायची असतील पण पैसे नसतील तर चिंता करण्याची गरज नाही. कारण आयसीआयसीआय बँक आपली ही चिंता दूर करत आपल्याला कर्ज प्रदान करत आहे. यासंबंधीची माहिती आपल्याला घ्यायची असेल तर आपल्या जवळील बँक शाखेला भेट द्यावी.  आपल्या जवळील बँक शाखेचा पत्ता जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे. https://maps.icicibank.com/mobile/  आयसीआयसीआय बँक आपल्याला दोन प्रकारचे कर्ज देते. कृषी अल्पकालिक आणि दीर्घकालिक असे याचे प्रकार आहेत.

किरकोळ कृषी पत - किसान क्रेडिट कार्ड / किसान कार्ड

किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे शेतकऱ्यांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी बनविण्य़ात आले आहे. या कार्डवरून आपण शेती व्यवसायासंबंधीचे अवजारे खते आदी वस्तू घेऊ शकतो.

 शेती व त्यासंबंधित कामांसाठी दीर्घकालीन कर्ज ( एग्री टर्म लोन)

आप आयसीआयसीआय बँकेतून कृषी टर्म लोन (एग्री टीएल) योजनेतून पशुपालन किंवा कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी टर्म लोन कर्ज घेऊ शकता. आपण आपल्या सोयीनुसार मासिक / अर्धवार्षिक / वार्षिक  हप्ताने ३ ते ४  वर्षांच्या कालवधीत या कर्जाची परतफेड करु शकता.

आयसीआयसीआय बँकेकडून कृषी कर्ज फायदे   

 • सरलीकृत दस्तऐवजीकरण.
 • सोपे आणि सोयीस्कर कर्ज.
 • तुमच्या उत्पन्नाच्या आधारे लवचिक कर्जाची परतफेड करण्याचा पर्याय.
 • आकर्षक व्याज दर
 • लपविलेले शुल्क नाही.
 • द्रुत प्रक्रिया.
 • तारण नसलेले कर्ज देखील उपलब्ध आहे.

आयसीआयसीआय बँकेकडून किसान कार्ड / किसान क्रेडिट कार्ड सुविधा मिळण्याचे काय फायदे आहेत?

आयसीआयसीआय बँक किसान क्रेडिट कार्डद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. त्यातील एक लाभ म्हणजे किसान क्रेडिट कार्ड मर्यादा ५ वर्षांसाठी मंजूर केली गेली आहे.  ज्यासाठी एक वेळ दस्तऐवजीकरण करावी लागेल. आपल्या शेतीविषयक गरजांसाठी वार्षिक आधारावर नूतनीकरण केले जाईल.

आयसीआयसीआय बँक किसान कार्ड / किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत?

 • अर्जदाराचे वय १८ ते ७० वर्षाच्या दरम्यान असावे.
 • त्याच्या ताब्यात काही शेती जमीन असावी.

कृषी कर्ज / किसान कार्डासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • अर्ज
 • आपला ग्राहक (केवायसी) कागदपत्रे जाणून घ्या
 • जमीनीचे कागदपत्रे

kisan credit card icici bank loan icici bank gives loan to farmers icici bank give loan for kcc holder किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना कर्ज आयसीआयसीआय बँक शेतकऱ्यांना देणार कर्ज किसान क्रेडिट कार्डधारकांना कर्ज
English Summary: icici bank gives loan to farmers, know the Eligibility

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.