सध्या राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकरी अडचणींचा सामना करत आहेत. असे असताना यावरून राजकारण तापले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला होता.
आता फडणवीस यांनी त्यांना जोरदार उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले की, वीज बिल माफ करा बोललोच नाही. वीज बिलाबाबत मध्य प्रदेश पॅटर्न राबवावा, अशी मागणी केली होती. पण तत्कालीन ठाकरे सरकारने एक रूपयाची ही सूट शेतकऱ्यांना दिली नाही.
यामुळे टीका करणाऱ्यांनी मनाची नाही तर जनाची ही लाज बाळगावी, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. यामुळे आता चांगलेच राजकारण तापले आहे.
चालू बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापावी, महावितरणच्या संचालकाचे आदेश
तसेच कोरोना काळात मध्यप्रदेश सरकारने वीजबिल स्थगित आणि नंतर माफ केले होते तसेच महाराष्ट्रातही करावे. तोच पॅटर्न राबवावा, अशी मी मागणी केली होती. पण महाविकास आघाडी सरकारने एक रुपया सूट दिली नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
कडकनाथ घोटाळ्याबाबत मोठी बातमी! कंपनीच्या संचालकाला अटक, शेतकऱ्यांचे बुडालेले पैसे मिळणार का?
महावितरणने पहिल्यांदाच असे पत्र काढले की फक्त सध्याचे चालू वीज बिल घ्यायचे. थकित बिलाची मागणी करायची नाही. उद्धव ठाकरेंना वीजबिल प्रश्नावर बोलायचा अधिकारच नाही. वीजबिलाच्या मुद्द्यावरून बोलणाऱ्यांनी जनाची आणि मनाची ही लाज बाळगावी, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
काट्यांबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, शेतकऱ्यांची काटामारी थांबणार का?
कर्जमाफी मिळूनही शेतकऱ्यांना दिली नोटीस, एसबीआय बँकेला बजावला दंड
चीनमध्ये लोकांचा लॉकडाऊनला विरोध, सरकारविरोधातील आंदोलनात 10 लोकांचा मृत्यू
Share your comments