1. बातम्या

देशात भुकेच्या व्यापाराला परवानगी दिली जाणार नाही- - टिकैत

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

देशात भुकेवर व्यापाराला परवानगी दिली जाणार नाही. भूक जेव्हाही वाढेल अन्नधान्याची मागणी तेव्हाही  वाढेव. देशात भुकेशी व्यापार करणाऱ्यांना बाहेर काढले जाईल, असे म्हणत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आंदोलन जीवी समुदायाच्या व्यक्तव्यावर टीका केली.

यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलन जीवी समुदाय उद्याला आला आणि त्याला देशाचा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान टिकैत यांनी हमीभावावर कायदा करण्यासह तिन्ही  कृषी कायदे रद्द करण्याची संयुक्त किसान मोर्चाची मागणी पुन्हा एकदा पुढे केली, याविषयीची बातमी अॅग्रोवन ने दिली आहे.

हेही वाचा : शेतकरी आंदोलन : एकत्र बसून मार्ग काढू - पंतप्रधान

देशात विमानाच्या तिकीटांचे दर दिवसांपासून तीन ते चार वेळेस बदलतात. शेतमालाचे दर मात्र त्या प्रमाणात बदलत नाहीत. आंदोलनाचा नवीन समुदाय निर्माण झाल्याच्या पंतप्रधानांच्या व्यक्तव्यावर ते म्हणाले की, यावेळी शेतकऱ्यांचा समुदाय उद्याला आला आहे आणि नागरिकही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत.नवीन कृषी कायद्यात हमी भावाची तरतूद नाही शेतकरी यामुळे कृषी कायद्यांना विरोध करत आहेत.कारण त्याशिवाय व्यापारी कमी दराने खरेदी करुन शेतकऱ्यांची लूट करत आहेत. टिकैत यांनी शेतकरी  आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्नांचाही समाचार घेतला.

सुरुवाताली हे आंदोलन पंजाबचे आहे असे म्हटले गेले. त्यानंतर शिखांचे, नंतर जाटांचे यांचे त्याचे म्हटले गेल. देशातील शेतकरी संघटित आहेत. यात छोटे किंवा मोठे शेतकरी नाहीत. हे आंदोलन शेतकऱ्यांचे आहेत.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters