1. बातम्या

शेतकरी आंदोलन : एकत्र बसून मार्ग काढू - पंतप्रधान

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील ज्येष्ठ नागरिकांना घरी पाठवा आंदोलन संपवा,एकत्र बसून चर्चा करुन व मार्ग काढू,असे आवाहन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कायदे संपुर्ण रद्द करण्याची शेतकऱ्यांची मुख्य मागणी राज्यसभेत बोलताना पुन्हा फेटाळली.

मात्र हमीभाव होता,आहे व राहिल याचाही पुनरुच्चा केला.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावाच्या चर्चेला उत्तर देताना सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलत होते.कृषी कायद्यात कालौघात दुरुस्त्या होऊ शकतात हे स्पष्ट करत आपल्या ७७ मिनिटांच्या भाषणात विरोधकांना मोदी म्हणाले की, साऱ्या शिव्या माझ्या खाती जाऊ द्या,शिव्या खायला हा मोदी असताना तुम्ही काळजी करू नका.सारे चांगले तुमच्या खात्यात जाऊ द्या.या कृषी सुधारणा ही काळाची गरज आहे हे तुम्हीही शेतकऱ्यांना समजावून सांगा.

देशात विदेशी गुंतवणूक वाढण्याची गरज असताना विदेशी विनाशकारी वैचारिकता नावाचा एक नवाच एफडीआय आला त्यापासून सर्वांनी दूर राहण्याची गरज आहे.शेतकऱ्याला त्याा शेतमाल कोठेही विकण्याचे स्वातंत्र्य देणारे,भारताला एक कृषी बाजार हवा याचे ठाम समर्थन करणारे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांचे वक्तव्य वाचून दाखविताना डॉ.सिंग यांनी म्हटले होते तेच काम मोदीला करावे लागत आहे.

याबदद्ल खरे तर तुम्हाला अभिमान वाटायला हवा,असे त्यांनी काँग्रेसच्या सदस्यांना सांगितले.

विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्या भाषणात काश्मीरमध्ये पंचायतीच्या निवडणुका झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले होते. आझाद यांच्या संसदीय वक्कृतशैली बद्दल प्रशंसा करताना मोदींनी, काँग्रेसचे लोक आझाद यांचे ताजे उद्धार सकारत्मक घेतील व जी २३ च्या संदर्भात त्याकडे  दुर्लक्ष करणार नाहीत असा चिमटा काढून त्यांनी काँग्रेस नेतृत्वबद्दलाबाबत स्पष्टोवक्ती करणाऱ्या २३ काँग्रेस नेत्यांच्या पत्राचाराही उल्लेख केला.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात आंदोलन करणाऱ्यांना टोला लगावला आहे.आतापर्यंत आपण बुध्दीजीवी, श्रमजीवी लोकांची  वर्गवारी आम्ही ऐकली . पण आपल्याकडे सध्या आंदोलनात जाऊन बसणारे व ते प्रश्न आणखी चिघळणारे अशा आंदोलन जीवी लोकांचा नवा समुदाय तयार झाला आहे, असा प्रहार करून मोदींनी, साहीन बागेपासून शेतकरी आंदोलनापर्यंत वारंवार वाहिन्यांवर झळकणाऱ्या काही नेत्यांना टोला लागवला. 

हे लोक परजीवी असतात व भारताला अस्थिर करणाऱ्या अशा लोकांना ओळखून  त्यांच्यापासून आपण सावधान राहिले पाहिजे,असे त्यांनी आवाहन केले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters