1. बातम्या

अंड्यांचे दर वाढणार? श्रीलंका भारताकडून रोज दहा लाख अंडी आयात करणार

गेल्या काही वर्षांपासून श्रीलंका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यामुळे देशात अनेक घडामोडी घडत आहेत. श्रीलंकेत अन्नधान्याची टंचाई भासत असून अनेक देशांकडून मदत मागितली जात आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
SriLanka will import eggs (image google)

SriLanka will import eggs (image google)

गेल्या काही वर्षांपासून श्रीलंका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यामुळे देशात अनेक घडामोडी घडत आहेत. श्रीलंकेत अन्नधान्याची टंचाई भासत असून अनेक देशांकडून मदत मागितली जात आहे.

आता श्रीलंकेत अंड्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे श्रीलंका भारतातून रोज दहा लाख अंडी आयात करणार आहे, असे श्रीलंकेतील आयातदार संस्थेने सांगितले. यामुळे भारतातून आता ही अंडी जाणार आहेत.

देशातील आर्थिक परिस्थितीचा येथील पोल्ट्री व्यवसायावरही या सर्व घटनांचा मोठा परिणाम झाला. येथील अंडी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. दुसरीकडे श्रीलंकेतील अंडी मागणी वाढली. यामुळे शेजारील भारत देशातून अंडी जाणार आहेत.

भारतात सोन्याच्या माशांचा व्यवसाय ठरतोय फायदेशीर, एक लाख रुपये गुंतवून होतोय फायदा..

सध्या श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात आयात करावी लागणार आहे. अंड्यांची खरेदी दोन पोल्ट्री फार्म्समधून होणार होती. पण पशुधन उत्पादन विभागाने आणखी तीन फार्म्सचा समावेश केला.

शिंदे सरकारने अक्रियाशील सभासदांबाबत घेतला मोठा निर्णय, छत्रपती कारखान्याच्या यादीवर होणार परिणाम?

या पाच फार्म्समधून रोज १० लाख अंडी आयात होणार आहे. यामुळे भारतात अंड्यांचे दर वाढतील का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. बेकरीसाठी ही अंडी लागणार आहेत.

राज्यात 10 जूनपर्यंत पावसाला सुरुवात होणार, शेतकऱ्यांची लगबग सुरू..
शेतकऱ्यांनो कापूस वाणाची निवड करताना घ्या योग्य काळजी
नमो शेतकरी महा सन्मान निधीला दिला हिरवा कंदील, आता शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार..

English Summary: Will the price of eggs increase? Sri Lanka will import one million eggs from India every day Published on: 31 May 2023, 12:52 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters