
rainy season be this year (images google)
सध्या राज्यात उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने पावसाळ्यात पाऊस पडणार की नाही? याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा अवकाळी व वळवाच्या पावसाने राज्याला हैराण करून सोडले आहे.
कधी नव्हे ते या उन्हाळ्यात उन्हाऐवजी पावसाळाच अधिक अनुभवायला मिळत आहे. येत्या मान्सूनमध्ये अल निनो सक्रिय होणार असून, त्याचा पावसावर काही प्रभाव पडणार नाही.
असे असताना अवकाळी व वळवाच्या पावसाचा आणि मान्सूनच्या पावसाचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे ही एक दिलासादायक बाब शेतकऱ्यांसाठी आहे.
मे महिना आहे खुपच उष्ण, पशुधनाची घ्या अशी काळजी..
या महिनाअखेर अजून सुधारित अहवाल हवामानशास्त्र विभाग जाहीर करणार आहे. त्यावर पावसाचा नक्की अंदाज समजणार आहे. अल निनोचा प्रभाव असतानाही यापूर्वी चांगला पाऊस झाल्याचे निरीक्षण आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे.
शासनाच्या दृष्टीने दारू किती महत्वाचीय माहितेय का? सरकारची तिजोरी फुल झालीय, विक्रीत 25 % वाढ
दरम्यान, कडक उन्हाने जमीन खूप तापत असते. चक्रीय वात स्थिती निर्माण होते आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तापलेल्या जमिनीवर ढग तयार होतात आणि मग पाऊस पडतो. त्याला अवकाळी अथवा वळीव म्हटले जाते.
शेतकऱ्यांना केवळ 1 रूपयात मिळणार पीकविमा, जाणून घ्या...
शेतकऱ्यांनो बजारात आलीत बनावट खते, अशा प्रकारे ओळख खरी खते..
किवीची शेती आहे खूपच फादेशीर, नापीक जमिनीतून हा शेतकरी लाखो रुपये कमावतोय
Share your comments