1. बातम्या

यंदा राज्यात पावसाळा कसा असणार?; जाणून घ्या पावसाचा अंदाज

मान्सुनच्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका होते. आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनवरच्या पावसावर अवलंबून आहे कारण जून-सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील ७० टक्के पाऊस पडतो. यामुळे शेतीसाठी हा मान्सून महत्वाचा ठरतो. नद्या, धरणं, तलाव, विहीरी भरण्यासाठी देखील मान्सून महत्त्वाचा ठरत असतो. मान्सुन मध्ये तसे तर जवळपास ८० टक्के इतका पाऊस पडत असतो तर साधारण ११% पाऊस ईशान्य मान्सूनमुळे पडतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Rain Update

Rain Update

देशात सध्या ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे तर कुठे तापमानाचा पारा वाढला आहे. उष्णतेमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. एकीकडे तापमानाने त्रस्त राज्यातील शेतकऱ्यांनी प्रतिक्षा आहे की कधी एकदा दिलासा देणारा मान्सून राज्यात येतोय. तर दुसरीकडे मात्र मान्सूनने काही भागात हजेरी लावली आहे. जसे की केरळ, तामिळनाडुमध्ये मान्सुन हा एक दिवस आधीच दाखल झाला आहे. हवामानात वेगवेगळे बदल सध्या पाहायला मिळत आहे. यामुळे मान्सूनची वाट शेतकरी आतुरतेने पाहात आहेत. याचबरोबर राज्यात मान्सून कधी दाखल होणार? यंदा पाऊस कसा असणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मान्सुनच्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका होते. आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनवरच्या पावसावर अवलंबून आहे कारण जून-सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील ७० टक्के पाऊस पडतो. यामुळे शेतीसाठी हा मान्सून महत्वाचा ठरतो. नद्या, धरणं, तलाव, विहीरी भरण्यासाठी देखील मान्सून महत्त्वाचा ठरत असतो. मान्सुन मध्ये तसे तर जवळपास ८० टक्के इतका पाऊस पडत असतो तर साधारण ११% पाऊस ईशान्य मान्सूनमुळे पडतो. मान्सूनचे दोन प्रकार असतात एक म्हणजे नैऋत्य मान्सून ज्याला आपण साऊथ-वेस्ट मान्सून म्हणतो. दुसरे म्हणजे ईशान्य मान्सून ज्याला आपण नॉर्थ वेस्ट मान्सून असे देखील म्हणतो.

केरळ मध्ये मान्सुन हा कधी दाखल झाला. केरळ मध्ये मान्सून वेळेआधीच दाखल झाला असून भारतीय हवामान विभागाने केरळ मध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख ३१ मे सांगितली होती. केरळमध्ये १ जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो, यंदा दोन दिवस आधीच मान्सुन येथे दाखल झाला. हा मान्सून केरळात ३० मे रोजी दाखल झाला असून IMD च्या अंदाजानुसार केरळ आणि तामिळनाडूमध्ये गेल्या ४८ तासांत मुसळधार पाऊस तर काही भागात अतिवृष्टी झाली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे की यंदा महाराष्ट्रात मान्सुन हा कधी दाखल होणार आणि यंदा पाऊस हा कसा असणार. गेल्यावर्षी देशात कहर करणारी स्थिती म्हणजे अल निनो कमकुवत होत असून या महिन्यात ला निना स्थिती सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार ला नीना परिस्थितीमुळे यंदा देशात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या मान्सूनबाबतीत सांगायचे झाले तर साधारणपणे जूनच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी अपेक्षा आहे. जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीएवढाच पाऊस पडेल असं हवामान विभागाचं भाकीत आहे. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता अनेक महाराष्ट्रतील जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी दोन महिने हा चांगला पाऊस हा संपुर्ण देभरात असणार आहे. तर हा पाऊस ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये असणार आहे. याचे मूळ कारण म्हणजे पावसासाठी अनुकूल असणारी ला निना स्थिती लवकरच सक्रिय होणार आहे. त्यामुळे दक्षिण द्वीपकल्प आणि मध्य भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.

English Summary: How will the monsoon season be in the state this year Know the rain forecast Published on: 05 June 2024, 03:59 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters