शेतात शेतीला पाणी देण्यासाठी विहीर आणि बोरवेलची मदत घेतली जाते. परंतु बोअरवेलच्या बाबतीत जर विचार केला तर बऱ्याचदा जमिनीतील पाण्याची पातळी किंवा जमिनीतील पाण्याचा स्त्रोत व्यवस्थित लक्षात न आल्यामुळे बोरवेल फेल जातात. यामुळे पाणी न लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते.
जर काही पद्धतींचा वापर केला तर या पद्धतींमध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बोरवेलला पाणी लागते तर बऱ्याच ठिकाणी हजार फुटापर्यंत बोअर खोदले जातात तरी देखील पाणी लागत नाही.
दरम्यान, जमिनीतील पाण्याचा खोलीचा अंदाज घेण्यासाठी झाडे आणि काही कीटक यांचे निरीक्षण केले जाते. भूजल शास्त्रज्ञ कडुलिंब, नारळ तसेच ताड किंवा खजूर यासारखे झाडांची वाढ व त्यांची वाढीची दिशा याचे निरीक्षण करतात.
झाडाच्या सर्व फांद्या कधीच वाकलेल्या नसतात. परंतु कधी कधी झाडाच्या फांद्या प्रमाणाबाहेर खाली वाकलेल्या दिसतात. जरा अशा झाडाच्या फांद्या खाली वाकलेल्या असतील तर त्या ठिकाणी पाण्याची पातळी खूप जास्त प्रमाणात आहे असा अंदाज लावता येऊ शकतो.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये मिळतील, अशी नोंदणी करा
तसेच ज्या जमिनीत किंवा शेतामध्ये वाळवी जास्त प्रमाणात असेल तर अशा ठिकाणी पाणी सापडण्याची शक्यता जास्त असते. एवढेच नाही तर अगदी कमीत कमी खोलीवर तुम्हाला पाणी मिळू शकते.
बोगस विमा धारक व त्यांना विमा उतरवून देणारे यांच्यावर कडक कारवाई, कृषी मंत्र्यांचे आदेश..
Share your comments