
Rain Update
राज्य
राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. आत्तापर्यंत राज्यात सुमारे १०६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
आतापर्यंत कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोकणात १२३ टक्के, विदर्भात १०८ टक्के, मराठवाड्यात ९६ टक्के तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ९० टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यातील २१ जिल्ह्यात पावसानं सरासरी गाठली आहे. तर आठ जिल्ह्यात सरासरीच्या अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
अजित पवारांकडून मदतीची घोषणा
राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्तांसाठी तातडीची १० हजार रुपयांची आर्थिक मदत अजित पवार यांनी जाहीर केली आहे.
Share your comments