छत्रपती संभाजीनगर
राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. तर कुठे पूरस्थितीही निर्माण झाली आहे. अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मात्र मराठवाड्यात अजूनही अपेक्षित असा पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहेत.
मुसळधार पावसामुळे राज्यातील काही नद्यांना पूर आलाय, कुठे नदीने इशारा पातळी गाठली आहे. तर कुठे नदी पात्राबाहेर पडल्याचे चित्र आहे. अनेक भागात अशी परिस्थिती असतांना मराठवाड्यात मात्र वेगळच चित्र आहे.
मराठवाड्यातील नांदेड जिल्हा वगळता औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांतील शेतकरी मुसळधार पावसाची वाट पाहत आहेत. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला होता.
दरम्यान, जुलै महिन्यात मराठवाड्यात सर्वदूर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. याशिवाय येत्या ४८ तासांमध्ये मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचंही आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे.
Share your comments