सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला आहे. देशात ऊस उत्पादकतेत राज्याचे अव्वल स्थान आहे. पाण्याने समृद्ध शिवारात जवळपास सर्वच शेतकरी ऊसाचे पीक घेतात. मात्र, सध्या ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड हैराण झालेला पहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात हिंगणगाव येथे ऊस पेटवून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना फारच हृद्यद्रावक होती. आत्महत्याग्रस्त शेतकरी अतिरिक्त ऊसाच्या गाळपाचा बळी ठरल्याने राजकारण सुद्धा तापले असून भाजप किसान मोर्चाने थेट उपमुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.
यापूर्वी अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नावर भाजप किसान मोर्चाने साखर आयुक्त कार्यालासमोर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी सहकार मंत्री व साखर आयुक्तांनी राज्यात २८ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अद्याप हा ऊस संपणे आवश्यक होते. मात्र तरी देखील १७ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असल्याचे सरकार सांगत असल्याने शिल्लक ऊसाचे गौडबंगाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याला स्पष्ट करावे अशी टिका भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केली.
अतिरिक्त उसाचे नियोजन करण्याची मागणी भाजप किसान मोर्चा करत असून याबाबत लेखी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे मागणी केली होती. तरी सुद्धा सरकारने अतिरिक्त ऊसाच्या गाळपाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. तर केवळ साखर आयुक्त आणि संबंधित विभागांना सूचना करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. या प्रकरणी सरकार दुर्लक्ष करत असल्याने किसान मोर्चाने ५ मे रोजी साखर आयुक्त कार्यालासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले होते.
टोमॅटोने हटवला दुष्काळ! टोमॅटो शंभर रुपये किलो, शेतकरी झाले मालामाल
या आंदोलनस्थळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी भेट देऊन अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देखील दिले होते. आंदोलना दरम्यान जवळपास ५० लाख मेट्रिक टन ऊस राज्यात शिल्लक असल्याचे किसान मोर्चाने सांगितले. मात्र सहकार मंत्री व आयुक्तांनी राज्यात केवळ २८ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असल्याची माहिती दिली होती. परंतू मे महिना संपत आला तरी अद्याप राज्यातील ऊस कसा संपला नाही असा सवाल भाजप किसान मोर्चा करत आहे.
तर राज्यात ३ लाख मेट्रीक टन ऊस शिल्लक असल्याचा दावा भाजप किसान मोर्चाचा असून सरकारने मात्र अजून १७ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असल्याचे स्पष्ट केल्याने यात काहीतरी गौडबंगाल असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री व साखर उद्योगातील तज्ञ अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन किसान मोर्चाने केले आहे. गाळपाविना शिल्लक असलेल्या ऊसाला हेक्टरी ७५ हजार रूपये तर ऊस पेटून देऊन तोड करून गाळप केलेल्या ऊसाला हेक्टरी २५ हजार अनुदान सरकारने द्यावे.
मोठी बातमी! दुधाला एफआरपी मिळणार, मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय
तसेच अतिरिक्त ऊसाच्या वाहतुकीसाठी प्रती टन व प्रती किलोमीटर ५ रूपये अनुदान सरकारने शेतकऱ्यांच्या बॅक खात्यामध्ये जमा करावे. हा निर्णय जाहीर करण्यास सरकार आणखी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची वाट पाहत आहे का असा सवाल किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी उपस्थित केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात देखील हा प्रश्न मिटेल की नाही हे लवकरच समजेल.
महत्वाच्या बातम्या;
Banana : काय सांगता! 13 इंच लांब केळी, केळी बघून कृषीतज्ञही झाले अवाक..
म्हैस खरेदीवर सरकार शेतकऱ्यांना देणार ५०% अनुदान, जाणून घ्या
ऊसतोड मजुरांचा सत्कार करून 3 एकर उसाला लावली काडी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
Share your comments