1. बातम्या

जमिनीचा NA म्हणजे नक्की काय? NA कसा करतात; जाणून घ्या...

राज्यामध्ये जसा विकास होत निघाला आहे तसा तसा राहण्यासाठी, वाढते उद्योगधंदे उभारणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची मागणी लागत आहे. जर शेतजमिनीमध्ये तुम्हाला या प्रकारचे उद्योग करायचे असेल तर राज्याच्या नियमानुसार करता येत नाही तर त्यासाठी शेत जमिनीचा एन ए करावा लागतो. आज आपण एन ए कसा करतो हे शिकणार आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
NA  of land

NA of land

राज्यामध्ये जसा विकास होत निघाला आहे तसा तसा राहण्यासाठी, वाढते उद्योगधंदे उभारणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची मागणी लागत आहे. जर शेतजमिनीमध्ये तुम्हाला या प्रकारचे उद्योग करायचे असेल तर राज्याच्या नियमानुसार करता येत नाही तर त्यासाठी शेत जमिनीचा एन ए (NA of land) करावा लागतो. आज आपण एन ए कसा करतो हे पाहणार आहे.

जमिनीचा एन ए कसा करतात?

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६९ साल नुसार शेतजमिनीचा वापर कोणत्याही विकास कामाकरता येत नाही तर त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते.जमीन एन ए करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

१. जिल्हा-अधिकारी कार्यालयात मिळणार फॉर्म भरून त्यावरती कोर्टाचा पाच रुपयांचा स्टॅम्प.
२. संबंधित जमिनीचा सातबारा उताऱ्याच्या चार झेरॉक्स लागतील.
३. जमिनीचा फेरफार उतारा.
४. तुमच्या जमिनीचे महसूल विभागाकडे कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड नसेल तर महसूल अधिकारी, तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडून जमिनीचे कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र.


५. संबंधित जमिनीचा ८अ चा उतारा.
६. तालुका जमीन रेकॉर्ड दिलेल्या कार्यलयाने जमिनीचा नकाशा लागेल.
७. इमारतीचा एन ए करायचा असेल तर इमारती प्लॅन च्या आठ झेरॉक्स.
८. जर जमीन राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, जलदगती महामार्ग यामध्ये येत असेल तर राज्य महामार्ग प्राधिकरण,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलदगती महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून तुम्हाला न हरकत असलेले प्रमाणपत्र घ्यावे लागेल.


९. ग्रामीण भागात राहत असाल तर ग्रामपंचायत चे न हरकत असणारे प्रमाणपत्र, शहरात राहत असाल महानगरपालिका किंवा शहरी स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र.
१०. जमीन बॉम्बे वहिवाट किंवा शेती कायदा 1948 अंतर्गत असेल तर एन ए साठी 43/63 या नुसार परवानगी मिळेल.
११. जी जमीन एन ए करायची आहे ती नक्की कोणत्या कामासाठी किंवा प्रकल्पासाठी करायची आहे ते सांगणारे तलाठी प्रमाणपत्र

जमीन एन ए करताना सरकारला भरावी लागेल रक्कम:-

१. शेतजमिनीचे रहिवासी जमिनीत रूपांतर करायचे असेल तर सरकारने ठरवलेल्या भावानुसार जमिनीच्या ५० टक्के रक्कम भरावी लागेल.
२. शेतजमिनीचे निमसरकारी जागेत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या भावाच्या २० टक्के रक्कम भरावी लागेल.
३. शेतजमिनीचे व्यावसायिक जमिनीत रुपांतर करायचे आहे तर जमिनीच्या भावाच्या ७५ टक्के रक्कम भरावी लागेल.
४. रहिवासी एनए चे औद्योगिक मध्ये रुपांतर करायचे असेल तर जमिनीच्या भावाच्या २० टक्के रक्कम भरावी लागेल.

धक्कादायक : कृषी विभागाचा फक्त 40 टक्केच निधी खर्च, शेतकरी योजनांपासून वंचित; आयुक्तांनी घेतली गंभीर दखल

जमिनीच्या एनए साठी अर्ज कसा करावा:-

  1. १. जिल्हा अधिकारी कार्यालायामध्ये अर्ज करावा.
    २. तो व्यक्ती जमिनीचा मालक आहे का नाही हे तहसीलदार पाहतात.
    ३. त्या जमिनीची तलाठ्याकडून चौकशी करून घेतली जाते.
    ४. ज्यावेळी जमीन एन ए झाली की कोणत्या पर्यावरण गोष्टीला अडचण आहे का किंवा प्रकल्पाला धोका आहे का हे तहसीलदार पाहतात.
    ५. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा अधिकारी जमीन रुपांतर करण्याची ऑर्डर काढतात.
    ६. आणि या सर्व प्रक्रिया नंतर तलाठी कार्यालयात जमिनीची एन ए अशी नोंद होते.

7th pay commission ! सरकारच्या 'या' निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा

English Summary: How exactly do NA of land, what exactly is NA? Published on: 02 November 2021, 08:34 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters