1. बातम्या

मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते शेतकऱ्यांना ट्रायकोकार्ड चे वाटप

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते शेतकऱ्यांना ट्रायकोकार्ड चे वाटप

मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते शेतकऱ्यांना ट्रायकोकार्ड चे वाटप

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राने दत्तक गाव घेतलेल्या खापरी येथील शेतकऱ्यांना ट्रायकोकार्ड चे वाटप करण्यात आले.यामध्ये खापरी गावचे सरपंच श्री प्रमोद गव्हाळे तसेच कृषी मित्र श्री सुरेश गव्हाळे यांना प्रतिनिधिक स्वरूपात ट्रायकोकार्ड चे वाटप मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस

यांच्या हस्ते वर्धा जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या निमित्ताने हे कार्ड वाटप करण्यात आले.This card was distributed by him on the occasion of Wardha District Planning Committee meeting. ट्रायकोग्रामा या परजीवी कीटकांची अंडे या कार्डवर असतात.

रब्बी ज्वारीची अशी करा सुधारित लागवड, होईल भरघोस उत्पन्न

ज्यामधून ट्रायकोग्रामा हा कीटक बाहेर निघून तो गुलाबी बोंड अळीच्या अंड्यांवरती आपली उपजीविका करतो हे ट्रायकोकार्ड कपाशीच्या शेतामध्ये प्रति एकरी तीन लावावे व एका सीझनमध्ये हे किमान पाच ते सहा वेळा लावावे. ट्रायकोकार्ड

शेतामध्ये लावल्यामुळे आपल्या शेतामधील ट्रायकोग्रामाची संख्या वाढून हे गुलाबी बोंड अळीने दिलेल्या अंड्यांवर आपली उपजीविका करतात त्यामुळे गुलाबी बोंड अळीचा होणारा प्रादुर्भाव हा कमी होतो व सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेतीसाठी हे अतिशय महत्त्वाचे ठरते. हा उपक्रम वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर जीवन कतोरे यांच्या वतीने तसेच डॉ. डी. बी. उंडिरवाडे संचालक, विस्तार शिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख

कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा यांनी घेतलेल्या दत्तक गावामध्ये करण्यात येत आहे. यासाठी कीटक शास्त्र विभाग कृषी महाविद्यालय नागपूर येथील डॉ. हरीश सवई यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ट्रायको कार्ड उपलब्ध करून मोलाची मदत केली. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. निलेश वजिरे, डॉ. रुपेश झाडोदे व श्री गजानन म्हसाळ कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा यांनी अथक परिश्रम घेतले.

English Summary: Hon. Distribution of tricho cards to farmers by Deputy Chief Minister Shri Devendraji Fadnavis Published on: 07 October 2022, 07:42 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters