1. बातम्या

हिवरे बाजार आदर्श गाव विकास प्रकल्प देश राज्य पातळीवर विशेष पुरस्काराचे मानकरी - मा पोपटराव पवार

नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार एक छोटेसे गाव मा पोपटराव पवार

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हिवरे बाजार आदर्श गाव विकास प्रकल्प देश राज्य पातळीवर विशेष पुरस्काराचे मानकरी - मा पोपटराव पवार

हिवरे बाजार आदर्श गाव विकास प्रकल्प देश राज्य पातळीवर विशेष पुरस्काराचे मानकरी - मा पोपटराव पवार

नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार एक छोटेसे गाव मा पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या प्रगतीच्या वाटेवर असताना राज्य शासन व देशपातळीवर विशेष पुरस्काराने सन्मानित होत आहे. अशा गावाचा आदर्श घेऊन आपण आपल्या माळी समाजाची गावे "महात्मा फुले गाव विकास प्रकल्प" या अभिनव उपक्रमात घेऊन सावित्री शक्तिपीठ विशेष संकल्पना राबवित आहे. अशा गावाची माहिती आपल्या माहिती साठी पुढीलप्रमाणे

हिवरे बाजार या गावातल्या २३० कुटुंबापैकी ६० कुटुंबे आहेत करोडपती.Out of 230 families in the village of Hivre Bazar, 60 families are millionaires.इथल्या नागरिकांचा सरासरी महिन्याची कमाई आहे ३०,०००/- हिवरे बाजार हे नगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. याविषयी तुम्ही ऐकलेही असेल.

हे ही वाचा - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - देशात लंपी व्हायरसचा कहर 58 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू

हिवरे बाजार समजून घेण्यासाठी इथली २० वर्षांपूर्वीची स्थिती पाहायला हवी. कसं होतं हे गाव?गावात दारूच्या भट्टय़ा होत्या.

इथून आजूबाजूच्या गावांना दारूचा मुबलक पुरवठा होत होता. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्थैर्य हे शब्द कानावरून गेले तरी खूप- अशी एकंदरीत परिस्थिती.एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली ‘शिक्षा’ म्हणून इथे होत असे. ‘कुछ नहीं होगा इस गाव का!’

अशीच धारणा होती.‘होती’ असं म्हणतोय त्या अर्थी आत्ता तशी परिस्थिती नाही, हे उघड आहे. पण कसं आहे आताचं ‘हिवरे बाजार’?गावची लोकसंख्या चौदाशेच्या आसपास. गावात एकही प्रौढ माणूस बेरोजगार नाही.गावातल्या २२६ घरांना आज आर्थिक स्थैर्य प्राप्त झालंय. शेती व दुग्धउत्पादन हे मुख्य व्यवसाय. या व्यवसायातून गावातली 60 कुटुंबे आज ‘मिलेनियर’ झाली आहेत! (त्यांचं वार्षिक उत्पन्न दहा लाखांच्या वर आहे.)या व्यवसायात स्त्रियाही अग्रेसर आहेत. गावात ऊस लागवडीला बंदी आहे. कारण त्याला भरपूर पाणी लागतं.

मुख्य पीक- कांदा - गावाने जलसंधारणाच्या योजना राबवून असा काही चमत्कार घडवून आणलाय, की वर्षभरात शंभर मि. मी. पाऊस पडूनसुद्धा गावातल्या २५३ विहिरींना बाराही महिने पाणी असतं. गावात सोळा हातपंप आहेत. गावातल्या डोंगरांवर गुरांना चरणं गावाच्या कायद्याविरुद्ध आहे. त्यामुळे चाऱ्याचं इतकं नियोजन होतं, की गावात चारा पुरतोच, शिवाय आजूबाजूच्या गावातले लोकही इथला चारा घेऊन जातात.चराईबंदीचा आणखी एक फायदा असा की, डोंगरावर पडणारं पावसाचं पाणी वाहून जात नाही.

ते नैसर्गिकरीत्या अडवलं जातं आणि जमिनीत मुरतं.थोडक्यात- गाव ‘सुजलाम्-सुफलाम्’ आहे...ज्या गावात एकेकाळी फक्त दारूच्या भट्टय़ा होत्या, त्या गावात आता दारू सोडाच, पान-सिगारेट, तंबाखू, गुटखा सगळ्याला बंदी आहे.संपूर्ण नशाबंदी - गावातल्या सगळ्या घरांना सारखा रंग. प्रत्येक घरावर घराच्या मालकाचं नाव सुंदर अक्षरांत लिहिलेलं. गावातले रस्ते सीमेंट-काँक्रीटचे. प्रत्येक घराला स्वतंत्र शौचालय. शासनाचे ग्रामस्वच्छतेचे सगळे पुरस्कार या गावाला मिळाले आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. ही स्वच्छता बाराही महिने असते.

English Summary: Hivre Bazar Adarsh ​​Village Development Project National State Level Special Award Winner - Ma Poptrao Pawar Published on: 13 September 2022, 12:15 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters