हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या प्रताप कावरखे या चिमुकल्याने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आपल्या घराच्या परिस्थितीची व्यथा मांडली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
“सायेब, पैसे लवकर द्या, मग आई पुरणपोळ्या करंल, तुम्ही बी खायला या...’ अशा भावनिक आशयाचे पत्र शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्र्यांना लिहीले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या पत्राची गंभीर दखल घेतली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी चिमुकल्या प्रतापच्या घरी भेट दिली आणि त्याच्या व्यथा जाणून घेतल्या.
हेही वाचा: अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबास मिळणार 2 लाखांची मदत; कशी ते पहा
समाजकल्याण विभागाकडून प्रतापच्या शिक्षणाची जबाबदारी आणि कुटुंबाला घरकुल देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यालयातून हिंगोली जिल्हा परिषदेत फोन केला.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रतापच्या घरी गोरेगावला भेट दिली व समाजकल्याण विभागाकडून प्रतापच्या शिक्षणाची जबाबदारी व कावरखे कुटुंबाला घरकुल देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा: 8 व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी; पगारात होणार बंपर वाढ
‘मी आईला म्हणालो की दिवाळीला आपल्याला पोळ्या कर. तर ती म्हणते बँकेत अनुदान आलं की करु. सणाला आमच्या घरी पोळ्या नाहीत. पैसेही नाहीत. आम्हाल घरही नाही. आम्हाला काहीच नाही. मी बाबांसोबत भांडण केले की आई म्हणजे जवळच्या गावात शेतकऱ्याच्या पोराने पैसे मागितले म्हणून त्याने फाशी घेतली.
आता मी बाबांकडे पैसे मागत नाही. साहेब आमचे घर पाहा. तुम्ही या. अनुदानाचे पैसे लवकर द्या. मग दिवाळीला आई पोळ्या करेल मग तुम्ही पण या पोळ्या खायला साहेब. तुमचा आणि बाबाचा लाडका प्रताप कावरखे वर्ग 6 जि.प. शाळा गोरेगाव हिंगोली.’, अशी व्यथा या विद्यार्थ्याने मांडली आहे.
हेही वाचा: दुर्दैवी! मातेचा तीन मुलींसह तलावात बुडून मृत्यू; आत्महत्या की घातपात? उलट सुलट चर्चा
Share your comments