1. सरकारी योजना

अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबास मिळणार 2 लाखांची मदत; कशी ते पहा

शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तीमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तीमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते.

अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेमधून नुकसान भरपाई दिली जाणार आहे. खालील प्रमाणे मदत दिली जाणार आहे. सर्व शेतकरी यांची विमा हप्त्याची रक्कम शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. त्यामुळे शेतकरी यांनी विमा हप्ता भरण्याची गरज नाही. याअंतर्गत शेतकर्‍यांना खालील प्रमाणे नुकसान भरपाई मिळते.

नुकसान भरपाईची रक्कम:

अपघाती मृत्यू- रु.२ लाख.
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.२ लाख अपघातामुळे १ डोळा अथवा १ हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.१ लाख.

हेही वाचा: 8 व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी; पगारात होणार बंपर वाढ

लाभ घेण्याकरीता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे

१. ७/१२ उतारा किंवा ८अ.(मुळ प्रत)
२. मृत्यू दाखला (स्वयं साक्षांकीत प्रत)
३. प्रथम माहिती अहवाल
४. विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल.
५. घटनास्थळ पंचनामा
६. जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र/ ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा पारपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र. वयाचा दाखला (नसल्यास शपथपत्र)
७. खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका (राजपत्रित अधिकारी यांनी सांक्षाकीत केलेली)

आ) प्रस्तावा सोबत सादर करावयाची आवश्यक कागद पत्रे :

१. ज्या नोंदी वरुन अपघातग्रस्त शेतक-याचे नाव ७/१२ वर आले असेल अशी संबंधीत फेरफार नोंद (गाव नमुना नं.६ ड) मुळ उतारा अथवा फेर फार नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिका-याने दिलेले प्रमाणपत्र.
२. शेतकऱ्याचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्या कडील गाव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. मुळ उतारा अथवा वारसाच्या नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्‍याने दिलेले प्रमाणपत्र.
३. विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र-ग).

हेही वाचा: शेतकऱ्याच्या लहान मुलाचे मुख्यमंत्र्यांना भावनिक करणारे पत्र, सोशल मीडियावर व्हायरल

अर्ज कोठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालयात.

विमा कंपनी : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
टोल फ्री नंबर-१८०० २२ ४०३०
विमा सल्लागार कंपनी (ब्रोकर) :- मे.ऑक्झिलियम इन्शुरंन्स ब्रोकींग प्रा.लि.
प्लॉट ने.६१/४, सेक्टर-२८, प्लाझा हट च्या पाठीमागे,वाशी, नवी मुंबई- ४००७०३
दुरध्वनी क्रमांक-०२२-२७६५००९६, टोल फ्री क्रमांक – १८०० २२० ८१२

हेही वाचा: ऊसाला प्रतिटन 4 हजार रूपये भाव द्या अन्यथा ऊसतोड नाही; मोठा निर्णय

English Summary: 2 lakhs will be given to the accident victims or their families Published on: 11 October 2022, 01:19 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters