1. बातम्या

विटामिन सी युक्त हिमाचलच्या लसणाला परदेशात अधिक मागणी

हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्हा आणि इतर जिल्ह्यांमध्ये लसूनचे पीक तयार झाले आहे. हिमाचल प्रदेश मधील अनेक बाजार समित्यांमध्ये लसूण विक्रीसाठी येत आहे. हंगाम चालू झाल्यानंतर लसणाला चांगली किंमत मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. येथील दर्शनाला दक्षिण भारत आणि परदेशात चांगली मागणी असते. हिमाचलमधील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये लसुन काढण्याचे काम जोरात सुरू झाले आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
लसणाला परदेशात मोठी मागणी

लसणाला परदेशात मोठी मागणी

 हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्हा आणि इतर जिल्ह्यांमध्ये लसूनचे पीक तयार झाले आहे. हिमाचल प्रदेश मधील अनेक बाजार समित्यांमध्ये लसूण विक्रीसाठी येत आहे. हंगाम चालू झाल्यानंतर लसणाला चांगली किंमत मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. येथील दर्शनाला दक्षिण भारत आणि परदेशात चांगली मागणी असते. हिमाचलमधील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये लसुन काढण्याचे काम जोरात सुरू झाले आहे.

कोरोना काळामध्ये लसणाला चांगले भाव मिळाल्याने लसणाचे उत्पादक शेतकरी आनंदित आणि उत्साहित आहेत. हिमाचल प्रदेशातील कुलु जिल्हा ऐवजी सिर्मौर, सोलन आणि मंडी मध्ये लसुन चे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. जर या परिसराचा विचार केला तर सिरमौर जिल्ह्यामध्ये लसणाचे उत्पादन अधिक प्रमाणात होते. तसेच हिमाचल मधील कुलु जिल्हा लसणाच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीला लसूण ला चांगला भाव मिळाल्याने पूर्ण हंगामात तेज टिकून राहील असा विश्‍वास शेतकऱ्यांना आहे.

हिमाचलमधील शेतकरी अनुप ठाकूर, अनिश, ज्ञान ठाकूर, जयचंद इत्यादी शेतकऱ्यांनी  सांगितले की, गेल्या वर्षीच्या अपेक्षेपेक्षा  यावर्षी यावर्षी लसनाचे उत्पादने 25 टक्के कमी आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की थंडीच्या काळात वेळेवर पाऊस आणि बर्फवृष्टी न  झाल्याने उत्पादनामध्ये घट नोंदवली गेली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जवळ-जवळ तीन हजार 900 हेक्टर जमिनीवर लसणाचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये जवळजवळ 58 हजार मेट्रिक टन लसुन उत्पादित होतो.

 

हिमाचल मधील कुल्लू जिल्ह्याचा विचार केला तर, जवळ जवळ या जिल्ह्यांमध्ये बाराशे हेक्‍टर जमिनीवर लसणाची लागवड केली जाते आणि उत्पादन हे जवळ जवळ एकोणावीस हजार मेट्रिक टन होते. कमी उत्पादन झाल्यामुळे लसणाचे भाव शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात मिळत आहेत. वर उल्लेख केलेल्या जिल्ह्यांमध्ये लसणाच्या पुरवठा हा हवा तेवढा नाही होत आहे. परत हिमाचलमधील इतर जिल्ह्यांमध्ये ए श्रेणीचा लसुन 80 ते 100 रुपया पर्यंत विकला जात आहे.

 

लसणाचे पीक हे तयार होण्यासाठी जवळजवळ नऊ महिने घेते. त्यासाठी भरपूर मेहनत करण्याची आवश्यकता असते. लसुन  उत्पादनातील महत्त्वाचा खर्च हा खते, लागवडीनंतर ची मशागत आणिलसुन काढणीला जास्त होतो. त्यासाठी मजुरीवर फार मोठ्या प्रमाणात खर्च येतो. हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यामध्ये लसणाच्या व्यापारामध्ये काही  कोटी रुपयांची उलाढाल होते.

English Summary: High demand for vitamin C rich Himachal garlic abroad Published on: 27 May 2021, 07:22 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters