शेतीचे चे उत्पादन वाढविण्यासाठी आपण कंपोस्ट खत तयार करतो याची कल्पना तर तुम्हाला आधी पासूनच आहे मात्र धान्यापासून खत तयार होणे हे तुम्ही कधी ऐकलं नसेल किंवा तुम्हाला कधी याची कल्पना नसेल मात्र हे खरं आहे. वैनगंगा या नदीला गतवर्षी पूर आलेला होता आणि त्यामुळे जर सरकारी गोदामत जे धान्य ठेवले होते ते भिजले गेले जे की सुमारे ६ हजार क्विंटल धान्य त्या गोदामात होते.धान्य भिजल्यामुळे ते सडले गेले आणि त्यामुळे सडलेल्या धान्याचे कंपोस्ट खत तयार करण्याचा निर्णय तेथील जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे.
खराब झालेल्या धान्याचे कंपोस्ट खत :
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीला जोरात पूर आलेला होता आणि या पुरात जे सरकारी गोदामात जे धान्य साठवले होते त्या धान्याची नासाडी झालेली आहे. धान्य भिजल्यामुळे तेथील जिल्हा प्रशासनाने ते धान्य वाळवायचा निर्णय घेतला होता मात्र ते धान्य अधिक प्रमाणात खराब होत निघाले त्यामुळे अत्ता ते खराब झालेल्या धान्याचे कंपोस्ट खत तयार करण्याचा निर्णय तेथील जिल्हा प्रशासनाने घेतला आणि याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला.सरकारने (govt)या प्रस्तावाला मंजुरी देताच अत्ता यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. १९९९ साली झालेल्या नियमानुसार हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे.
नष्ट झालेल्या धान्यात काय-काय होते:
मागील वर्षी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीला पूर आला होता त्यामुळे सरकारी गोदामात हे धान्य ठेवले होते ते भिजले गेले. जवळपास गोदामात ६ ते ७ फूट पाणी (water) साचले होते. सुमारे सरकारी गोदामात १७ हजार क्विंटल धान्य होते त्यामधील ६ बाजार २६३ क्विंटल धान्य खराब झाले जे की त्यामध्ये १ हजार ८३३ क्विंटल गहू, १८८ क्विंटल चणा डाळ, ३ हजार ८२६ क्विंटल तांदूळ, २६६ क्विंटल तूर दाळ आणि १४४ क्विंटल साखर होती.
यामुळे घ्यावा लागला निर्णय:
पुरामुळे सरकारी (govt) गोदामात जे धान्य होते ते भिजले मात्र तेथील जिल्हा प्रशासनाने ते धान्य वाळवून चांगले करायचा प्रयत्न केला होता मात्र ते अधिकच खराब होत निघाल्याने तेथील आसपासच्या परिसरात याची दुर्गंधी सुटली आणि लोकांना त्रास होयला सुरू झाले आणि याचा त्रास तेथील लोकांना होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला.
कृषी विज्ञान केंद्रात पाठविले जाणार धान्य:
मागील वर्षात जो पूर आलेला होता त्यात जे धान्य सडले होते ते गोदामातच होते जे की जिल्हा प्रशासनाने जो प्रस्ताव पाठवला होता त्यानंतर सरकारच्या ताब्यात हे गोदाम आहे. या गोदामातील धान्य साकोली कृषी विज्ञान केंद्रात पाठवले जाणार आहे आणि तिथेच कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारीनी दिलेली आहे.
Share your comments