गेल्या काही दिवसात देशभरात पावसाने थैमान घातलं.अनेक राज्यात पुर परिस्थिति निर्माण झाली होती.महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाने चांगलाच थैमान घातलं. मात्र, कालपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.पुणे, मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे.
त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. तर पहाटेपासून पुण्यासह परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे.Rain has been present in the area including Pune since morning.
हे ही वाचा - सिंदखेडराजा तालुक्यात आढळली घोणस अळी, गावातील कीटकशास्त्र तज्ञाने केले त्वरीत मार्गदर्शन
इतर जिल्ह्यात, पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता
आहे. तर विदर्भासह मराठवाड्याच पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.सध्या राज्यात पावसाचा जोर कमी होताना दिसत
आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद परिसरात मात्र, पावसाने जोरदार हजेरी लावली. आज विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सोलापूरमध्येही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Share your comments