1. बातम्या

मराठवाडा, कोकण, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार, मुंबईतही दमदार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं पावसाचा पुढील चार दिवसांसाठी अंदाज जारी केला आहे. कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड वर असल्याने आणि 15° उत्तर वर पूर्व-पश्चिम शियर जोन आहे. या परिस्थितीचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता आहे.

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, कोकणात ठाणे, पालघर आणि मुंबईत जोरदार पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आज मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाने आजच्या दिवसासाठी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर,रत्नागिरी, रायगड, जळगाव, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अकोला, अमरावती, परभणी, वाशिम, यवतमाळ, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

 

मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पुणे पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.
1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters