1. बातम्या

Kolhapur Rain Update : कोल्हापुरात पावसाची संततधार; २४ बंधारे अद्यापही पाण्याखाली

कोल्हापूर धरण क्षेत्रात गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जवळपास ८३ बंधारे पाण्याखाली गेले होते. नद्यांनी देखील इशारा पातळी गाठली होती.

Rain Update

Rain Update

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही हलक्या पावसाची संततधार आहे. मागील आठवड्यात कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले होते. त्यातील २४ बंधारे अजूनही पाण्याखालीच आहेत. 

कोल्हापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जवळपास ८३ बंधारे पाण्याखाली गेले होते. नद्यांनी देखील इशारा पातळी गाठली होती. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. 

राधानगरी धरणाचे अद्यापही २ दरवाजे उघडे आहेत. त्यामुळे भोगावती नदीपात्रात ४ हजार २५६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.

English Summary: Heavy rains in Kolhapur 24 dams still under water Rain Update Published on: 02 August 2023, 02:01 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters