Nagar News :
अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाने गेल्या काही महिन्यांपासून दडी मारली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली पिकं अक्षरशः जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने खरीप पिकांची लागवड केली. पण पावसाने दडी मारल्यानंतर शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तसंच आता या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.
ज्या भागात चारा पीके आहेत त्या भागात तरी सरकारने पाण्याची सोय करावी. तसंच सध्या माणसांना पिण्यासाठी पाणी नाही, अशी स्थिती जिल्ह्यात उद्भवू लागली आहे. यावर सरकारने आठ दिवसांत उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांना जगण्यासाठी मदत करावी, अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.
जिल्ह्यात पावसाने चांगलीच दडी दिली आहे. त्यामुळे शेतकरी पाण्याअभावी हवालदिल झाले आहेत. पाण्याअभावी पीके माना टाकू लागले आहेत. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी. तसंच १०० टक्के पीकविमा देखील द्यावा,अशी प्रतिक्रिया देखील एका शेतकऱ्यांने दिली आहे.
हवामान खात्याने राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाच अंदाज दिला आहे. उद्या (दि.३०) रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाच अंदाज दिला आहे. उद्या (दि.३०) रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे.
Share your comments