अमरावती
अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतजमीन खरडून गेल्या आहेत. यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.
जोरदार झालेल्या पावसामुळे पेरणी केलेले सोयाबीन, कपाशी, तूर पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करुन देखील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडले आहेत.
अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार तालुका सोडला तर इतर तालुक्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील पाच ते सहा गावांचे नुकसान झाले आहे.
वाशिम-अमरावती महामार्गावर मंगरूळ तालुक्यातील धोत्रा गावातील जुना प्रवासी निवारा कोसळून एका व्यक्तीचा दबून मृत्यू झाला. जोरदार पावसामुळे हा जुना जीर्ण अवस्थेत असलेला प्रवासी निवारा पावसाने कोसळला. या घटनेमध्ये देमाजी ठोंबरे या व्यक्तीचा दबून मृत्यू झाल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे.
Share your comments