सध्या उन्हाळा एवढा वाढतच चालला आहे की उन्हाने सगळ्यांना हैराण करून सोडले आहे. मात्र या दरम्यानच २१ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान अर्ध्या महाराष्ट्र राज्यात वादळी वारे तसेच पाऊस बरसण्याची दाट शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे अशी माहिती के.एस.होसाळीकर यांनी ट्विटर च्या माध्यमातून दिलेली आहे. २१ ते २३ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटसह वादळ तसेच पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अनेक फळबाग उत्पादकांना चिंता पडलेली आहे. राज्यामध्ये दिवसेंदिवस कडाक्याचे ऊन पडत आहे. जे की काही जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा ४० अंश डिग्री सेल्सिअस पुढे गेलेला आहे जे की अशातच पाऊसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने शेतकऱ्यामध्ये चिंता वाढलेली आहे.
कोणते जिल्हे अलर्टवर?
महाराष्ट्र राज्यात असणारे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यात २१ आणि २३ एप्रिल दरम्यान पाऊस पडणार असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण बनलेले आहे. अगदी हातातोंडाला आलेले पीक मातीमोल होणार अशी भीती शेतकऱ्यांमध्ये बसलेली आहे. पुणे वेध शाळेने वर्तविला असलेला हा अंदाज जर अचूक ठरला तर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
अनेक जिल्हे अलर्ट मोडवर :-
बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमधे जास्त पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जे की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. जे की या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार असल्याचे सांगितले गेले असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झालेले आहेत. तसेच राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये अनेक भागात धुळीचे वादळ येणार असल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली :-
मागील दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना कोरोना चा मोठा झटका बसलेला आहे. के की लॉकडाउन मध्ये शेतकऱ्यांचा माल सडून गेला आहे. मात्र यंदा सर्व व्यवस्थित चालू असताना पाऊसामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर संकट येण्याचे दिसत आहे. यापूर्वी आधीच अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच दुष्काळ पडत असल्याने शेतकरी संकटात असायचा मात्र आता फळबाग तोडणीला आलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी यासाठी कर्ज सुद्धा काढलेले आहे मात्र आता या संकटांमुळे शेतकरी कसे कर्ज फेडतील हे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Share your comments